आजरा तालुक्यात योग प्रात्यक्षिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा तालुक्यात योग प्रात्यक्षिके
आजरा तालुक्यात योग प्रात्यक्षिके

आजरा तालुक्यात योग प्रात्यक्षिके

sakal_logo
By

आजरा तालुक्यात योग प्रात्यक्षिके
आजरा ः तालुक्यात जागतिक योगदिनी विविध प्रशालेत योग प्रात्यक्षिके झाली. येथील आजरा महाविद्यालयात एन. सी. सी., एन. एस. एस. व क्रीडा विभागातर्फे योग दिन झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य. डॉ. अशोक सादळे होते. योग शिक्षक बाळकृष्ण दोरुगडे यांनी जीवनामध्ये योगाचे महत्त्व व फायदे याची माहिती दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ, अधीक्षक योगेश पाटील, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी येसणे, एन. सी. सी. ऑफिसर महेश पाटील, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. आर. डी. मधाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. एन. सी. सी. ऑफिसर अजित तोडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. एस. के. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. जे. पाटील यांनी आभार मानले. व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये योग प्रात्यक्षिके सादर झाली. प्राचार्य एस. सी. खोराटे यांनी मार्गदर्शन केले. आर. पी. होरटे यांनी योगाचे महत्त्व सांगितले. क्रीडा शिक्षक एस. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती दोरूगडे, वेदिका गुरव, प्रीती पाटील, सान्वी निऊंगरे, आस्था गुरव, अस्मिता नावलकर यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी एस. एन. पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील कै. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एल. एम. चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. योग शिक्षक आर. एस. पाटील यांनी योगदिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी योग प्रवेश वर्गाचे उद्‍घाटन झाले. देवर्डे (ता. आजरा) येथील विद्यामंदिर देवर्डे व रवळनाथ हायस्कूल देवर्डे या शाळेमध्ये योग शिक्षक सुनील सुतार यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक नामदेव माईनकर, सुभाष सावंत, संयोगिता सुतार, सरोजिनी कुंभार, चंद्रकांत घुरे, देवेंद्र शिखरे, महेश नावलगी, राजेंद्र पाटील, महादेव तेजम, रेश्मा बोलके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
वसंतरावदादा पाटील विद्यालय
उत्तूर ः येथील इंदिरानगरमधील वसंतरावदादा पाटील विद्यालयात योग दिनी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पोटे उपस्थित होते. अस्मिता गुरव यांनी स्वागत केले. साधक मानसी पोटे, सिद्धी पोटे व स्वराज कुंभार यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले. किरण आमणगी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र येसादे यांनी आभार मानले.
------------
30826
राजगोळी खुर्द : अंगणवाडीत योग प्रात्यक्षिके करताना बालके.

तणावमुक्त आनंदी जीवनासाठी योग महत्त्वाचा
राजश्री कुंभार, चंदगड तालुक्यात शाळा, महाविद्यालयातून योगाची प्रात्यक्षिके
चंदगड, ता. २१ ः तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे मत योग शिक्षिका राजश्री कुंभार यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अनिल गवळी अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, तालुक्यात विविध ठिकाणी योगाची प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा करण्यात आला.
येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये योग प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. प्राचार्य आर. पी. पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगितले. टी. व्ही. खंदाळे यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शवासन, हास्यासन आदी प्रकार करून घेतले. पुष्पा सुतार यांनी व्यायाम गीतावर व्यायाम प्रकार करून घेतले. र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांकडून योगासने करून घेतली. प्रा. एस. एन. पाटील यांनी सहकार्य केले.
पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. सेवानिवृत्त अधिकारी ए. एस. सावळगी यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. सेंट स्टीफन स्कूलमध्ये मुख्याध्यापिका अपूर्वा पाटील, अनंत गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रांतही योग दिन साजरा करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70041 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top