वीरशैव बँक व्यवस्थापन समिती सदस्यपदी यरटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीरशैव बँक व्यवस्थापन समिती सदस्यपदी यरटे
वीरशैव बँक व्यवस्थापन समिती सदस्यपदी यरटे

वीरशैव बँक व्यवस्थापन समिती सदस्यपदी यरटे

sakal_logo
By

30789
गडहिंग्लज : वीरशैव बँकेच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राजशेखर यरटे यांचा सत्कार करताना डॉ. सतीश घाळी. शेजारी मान्यवर.

वीरशैव बँक व्यवस्थापन
समिती सदस्यपदी यरटे
गडहिंग्लज, ता. २१ : कोल्हापूरच्या श्री वीरशैव बँकेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी येथील प्रतिष्ठित व्यापारी राजशेखर यरटे यांची निवड करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार या समितीची स्थापना झाली आहे. यरटे हे गडहिंग्लज व्यापारी नागरी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. सहकार व बँकिंग क्षेत्रातील अनुभव विचारात घेऊन त्यांची निवड केली आहे. वीरशैव बँकेतर्फे संचालक सतीश घाळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन यरटे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेचे शाखाधिकारी देसाई, उद्योजक सुरेश कोळकी, विश्‍वनाथ पट्टणशेट्टी, अरुण तेलंग, राजू दड्डी, सोमगोंडा आरबोळे, रमेश रिंगणे, बसवराज आजरी, सुरेश आजरी, मलगोंड पाटील, गजेंद्र बंदी, संजय देसाई, संजय खोत, सुबराव जगदाळे, महेश तुरबतमठ, सोमगोंडा देसाई, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70060 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top