
शाहू जयंती विधवांचा सन्मान
30884
विधवांना पूर्णांगी म्हणून सन्मान द्या
प्राचार्या रेखा निर्मळे ः शाहू जयंती लोकोत्सव समितीतर्फे विधवांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘‘वैधव्य येणे हा कोणत्याही महिलेचा दोष नसतो. त्यामुळे सार्वजनिक, घरगुती कार्यक्रमांत विधवा महिलांना बाजूला न ठेवता सन्मान दिला पाहिजे. त्यांना पूर्णांगी म्हणून सन्मान द्या, असे आवाहन पेठवडगाव कॉलेजच्या प्राचार्या रेखा निर्मळे यांनी केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे विधवांचा सन्मान सोहळा झाला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या,‘‘विधवा पुनर्विवाह करून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शाहू जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. ज्या राजर्षी शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह संरक्षण असे कायदे करून पुरोगामीत्वाकडे पावले टाकली. त्यांच्याच भूमीत विधवा पुनर्विवाह आंतरजातीय विवाहांना बळ दिले पाहिजे.’’
उत्सव समितीतर्फे १० दिवस शाहू विचारांचा जागर प्रबोधन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेतला. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वीरशैव बँकेच्या संचालिका सरला पाटील, मालन पोवार, सुधा सरनाईक, पूजा शिराळकर, सरिता हारुगले, धनश्री तोडकर, छाया जाधव, सुवर्णा मिठारी, मीनाक्षी डोंगरसाने, चंद्रकांत यादव, रमेश मोरे, शुभम शिरहट्टी, अशोक पोवार, युवराज कदम आदी उपस्थित होते. दरम्यान, बुधवारी (ता.२२) दुपारी बारा वाजता भवानी मंडपात सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय वधू-वरांचा विवाह समारंभाचे आयोजन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70161 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..