स्टुडंट फेडरेशन निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टुडंट फेडरेशन निवेदन
स्टुडंट फेडरेशन निवेदन

स्टुडंट फेडरेशन निवेदन

sakal_logo
By

30891

अग्नीपथ योजना मागे घ्यावी
ऑल इंडीया यूथ फेडरेशनचा तिरंगा मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता.२१ ः अग्नीपथ योजनेद्वारे सैन्य दलाचे व सैनिक पदांचे खासगीकरण होण्याचा संभव असून, या योजनेस विरोध आहे. ही योजना मागे घ्यावी अशी मागणी ऑल इंडीया युथ फेडरेशनने तिरंगा मोर्चातून केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना दिले.
या निवेदनातील माहिती अशी, केंद्र सरकारने बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळत अग्निपथ योजना आणली आहे. देशात बेरोजगारांची संख्या वाढती आहे. सत्तेत येताना भाजपने दरवर्षी दोन कोटी रोजगार पुरवण्याची वचन दिले होते. तेही पाळलेले नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांची फसवणूक झाली आहे. सीएमआयइच्या अहवालानुसार बेरोजगारीचा दर हा ९ टक्क्यांवर गेला आहे. सरकारी विभागात २४ लाख पदे रिक्त आहेत. त्यांची भरती झालेली नाही. या उलट सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण व रोजगाराचे कंत्राटीकरण केले जाते आहे. राज्यातील पोलिस भरती, सरळ सेवा भरती ठप्प आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्ष युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष दुर्लक्ष करून निवडणुकांचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत.
फाउंडेशनचे राष्ट्रीय सदस्य गिरीश फोंडे, राज्य सचिव जावेद तांबोळी, रोहित कांबळे, ऋषीकेश पाटील, अमित कळके, नितीन माने, जावेद मुल्लानी, रवी जाधव आदी उपस्थित होते.

चौकट
मागण्या पुढीलप्रमाणे...
-राज्यातील प्रलंबित पोलिस भरती त्वरित करा
-पोलिस भरतीत प्रथम शारीरिक चाचणी
व नंतर लेखी चाचणी पूर्वी प्रमाणे घ्यावी
-सरळ सेवा भरती त्वरित सुरू करावी
-सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घ्याव्यात
-सैन्य दलात अर्ध सैनिक तसेच निमलष्करी
दलातील दोन लाख रिक्त पदे पूर्णवेळ त्वरित भरा
-कोणत्याही परीक्षेसाठी ५० रूपयांपेक्षा ज्यास्त शुल्क नको

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70180 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top