भाजप आनंदोत्सव बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप आनंदोत्सव बातमी
भाजप आनंदोत्सव बातमी

भाजप आनंदोत्सव बातमी

sakal_logo
By

30908

विधान परिषद निवडणुकीतील
विजयाचा भाजपतर्फे जल्लोष

कोल्हापूर, ता. २१ ः विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आले. याचा आंदोत्सव कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी चौकात साजरा केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर नृत्य करून पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
राहुल चिक्कोडे म्हणाले,‘देवेंद्रजी हे एकटे नसून त्यांच्या मागे भाजपा सक्षम नेत्यांची भक्कम टीम आहे. गेली ३ वर्षे शिवसेनेने जी अनैसर्गिक युती केली होती याची खंत या राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीत दिसून आली.’ भाजप नेते महेश जाधव म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. ते लवकरच मुख्यमंत्री होतील.’ सरचिटणीस विजय जाधव यांनी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, हेमंत आराध्ये, प्रवक्ता अजित ठाणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. गणेश देसाई, अजित ठाणेकर, सुनीलसिंह चव्हाण, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, संदीप कुंभार, प्रसाद मुजुमदार, प्रीतम यादव, विवेक कुलकर्णी, भरत काळे, अशोक लोहार, प्रविणचंद्र शिंदे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, सुजाता पाटील, समयश्री आययर, स्वाती कदम, रजनी भुर्के, अशोक लोहार, सुशांत पाटील, राजू पोळ, ओंकार खराडे, अरविंद वडगांवकर, प्रकाश घाटगे, कोमल देसाई, मामा कोळवणकर, रमेश दिवेकर, सचिन जाधव, सचिन आवळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70182 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top