
अग्निपथ म्हणजे विकास पथ ः भाजयुमो
30892
अग्निपथ योजना लाभदायी
-
भारतीय जनता युवा मोर्चाची भूमिका
कोल्हापूर, ता.२१ ः भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज महावीर महाविद्यालयात सेनादलाच्या वतीने देशभरात नव्याने राबवलेल्या सेनाभरती प्रक्रिया म्हणजेच ''अग्निपथ योजना''च्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांना माहितीपत्रक वाटण्यात आले.
पत्रकातील माहितीनुसार, गेले काही दिवस देशात अग्निपथ योजनेसंबंधित काही लोकांनी भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. मुलांमध्ये नाहक गैरसमज निर्माण केला. युवापिढीला देशभरात दंगल करण्यास प्रवृत्त केले. रेल्वेची जाळ-पोळ, सरकारी संपत्तीचे नुकसान करून त्यांनी काय साध्य केले? आपल्या पश्चिम महाराष्ट्रातही युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आर्मी-पोलिस भरतीची तयारी करत असतो. त्याच अनुषंगाने अग्निपथ योजना लाभदायी आहे. या योजने अंतर्गत चार वर्षांनंतर आपण या योजनेतून मिळणाऱ्या निधीचे कोणत्या प्रकारे वापर करू शकतो हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील म्हणाले " या योजनेला भाजपाचा जाहीर पाठिंबा आहे, तसेच ज्या लोकांचा या योजनेला विरोध आहे त्यांनी दंगल व हिंसाचार न करता आमच्याबरोबर हे पत्रकारपरिषदे अंतर्गत एक चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी." सरचिटणीस विवेक वोरा, गिरीश साळोखे, पारस पलीचा, विजय दरवान, सुनील पाटील, गौरव सातपुते, प्रसाद पाटोळे, हर्शांक हरळीकर, नितीश कुलकर्णी, अक्षय मोरे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70204 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..