
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ इचलकरंजीत शिवसैनिक एकत्र
30958
------------
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ
इचलकरंजीत शिवसैनिक एकत्र
इचलकरंजी, ता. २२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शिवसैनिक एकत्रित येत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगत पाठिंबा देत आहेत. इचलकरंजी शहर शिवसेनेतर्फेही के. एल. मलाबादे चौकामध्ये एकत्रित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवसेनेमधून बाहेर गेलेल्या आमदारांनी संध्याकाळपर्यंत पक्षामध्ये परत यावे, असे आवाहन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारमधील मुख्यमंत्रिपद असलेल्या शिवसेनेतच फूट पडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्य सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी कार्यकर्ते के. एल. मलाबादे चौकात एकत्रित आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील आणि जो निर्णय घेतील, तो मान्य आहे. शिवसैनिकांमध्ये प्राण आहे, तोपर्यंत तुमच्या सोबत आहेत. ज्यांनी बंड केले आहे, त्यांना निवडून देणारा शिवसैनिक मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत असल्याने ‘फिनिक्स’प्रमाणे शिवसेना पुन्हा भरारी घेईल.’’ महादेवराव गौड, सात्ताप्पा भवान, मधुकर पाटील, वैभव उगळे, सयाजीराव चव्हाण, संदीप पाटील, शिवाजी पाटील, विजय जोशी, मलकारी लवटे आदी उपस्थित होते.
जगताप
-------------1.30----
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70270 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..