दहावी निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी निकाल
दहावी निकाल

दहावी निकाल

sakal_logo
By

रेडेकर हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
आजरा ः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील कै. केदारी रेडेकर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला. समृद्धी गोपाळ आजगेकर (९३.२०), कोमल धनाजी डोंगरे (९०.२०), सृष्टी श्रीकांत येजरे (८९.४०), सुजल सुरेश लोहार (८८.६६), समीक्षा दयानंद देवरकर (८६.००). संस्थेच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, सचिव शिपूरकर, मुख्याध्यापक एल. एम. चव्हाण, शिक्षक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

शिंदे हायस्कूलचा १०० टक्के निकाल
गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. श्रेया देसाई व निहार नाईक यांनी ९७.२० टक्के गुणासह पहिला क्रमांक मिळविला. वेदांत साबळे (९७), सौंदर्या देसाई (९६.८०) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. ७३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

बहिरेवाडी शाळेचा १०० टक्के निकाल
उत्तूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील भैरवनाथ हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. वैभवी दावणे (९४ टक्के), ऋतुजा खोंद्रे (९३.२०), अनिकेत नाईक (८६.२०) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

गडहिंग्लज हायस्कूलचा निकाल ९८ टक्के
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.९१ टक्के इतका लागला. सेमी इंग्रजीचा निकाल शंभर, तर मराठी माध्यमाचा निकाल ९८.३८ टक्के लागला. स्वरांजली जाधवने ९६.८०, मलिहा पठाणने ९६.२०, तर अनुक्षा नावलगीने ९३.६० टक्के गुण मिळवून शाळेत पहिले तीन क्रमांक पटकावले. ९० टक्क्यापेक्षा अधिक ९, ८५ टक्क्याहून अधिक ३०, तर ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतलेले २७ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापक, शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70424 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top