आजऱ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
आजऱ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

आजऱ्यात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

sakal_logo
By

31117
आजरा : शहरात फिरणारी मोकाट कुत्री.

मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
---
आजऱ्यात वाढता उपद्रव; बंदोबस्ताची नागरिकांची मागणी
आजरा, ता. २२ ः शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. ही कुत्री अंगावर येत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना शहरातून वावरताना दक्षता घ्यावी लागते. मोटारसायकलस्वारांच्या मागे कुत्री लागत असल्याने मोटारसायकल चालविताना कसरत करावी लागत आहे. नगरपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
गेले सहा महिने शहरात कुत्र्यांच्या झुंडी वावरत आहेत. यात सुमारे दहा-बारा कुत्री आहेत. ही कुत्री बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वावरत असून, यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास ती अंगावर येत आहेत. या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व लहान बालके यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. कधीही कुत्री अंगावर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्यांचा चावाही या कुत्र्यांनी घेतल्याचे नागरिक सांगतात. आज सकाळी कुत्र्यांची झुंड एका मोटारसायकलस्वाराच्या आडवी आल्याने मोटारसायकलस्वार व त्याच्या मागे बसलेला दोघेही रस्त्यावर पडले. त्यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
-------------
चौकट
नगरपंचायत सभेत बंदोबस्ताची चर्चाच
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. याबाबत नगरपंचायतीच्या मासिक सभेत सातत्याने चर्चा झाली. अजूनही याबाबत नगरपंचायतीने पावले उचलली नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70444 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top