जलतरण विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण विषय
जलतरण विषय

जलतरण विषय

sakal_logo
By

जलतरण स्पर्धांनी हंगामाचा गोड शेवट
--
कोरोनानंतर लांबलेल्या स्पर्धा यंदा सुरळीत; २५० जलतरणपटूचा सहभाग


सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : कोरोनामुळे प्रदीर्घ विश्रांती घेतलेले क्रीडा क्षेत्राने जिल्ह्यात पुन्हा एकदा कात टाकली. विविध स्पर्धा, पाच वर्षांनंतर जलतरण स्पर्धा झाल्या. याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या हंगामात सर्व स्पर्धा सुरळीत सुरू होणार याचे संकेत दिले आहेत. तलवारबाजीची राज्य स्पर्धा कोल्हापूरमध्ये झाली आणि प्रदीर्घ विश्रांतीनंतर खेळाडूंसाठी सुखवार्ता आली. बिगुल वाजल्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी पुन्हा मैदानावर घाम गाळायला सुरुवात केली. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन नॅशनल व शेवटी जलतरणाने यंदाच्या क्रीडा हंगामाची गोड सांगता झाली.
कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्राला बसल्यानंतर सर्वाधिक प्रभावित झालेल्या खेळ प्रकारात जलतरण होते. जलतरणाच्या तलावाचा सामुदायिक वापर हा कोरोना वाढीसाठी कारण असल्यामुळे जिल्ह्यासह देशभरातील सार्वजनिक जलतरण तलाव बंद झाली. शहरातील जलतरण तलाव बंद झाल्यामुळे जिल्ह्याभरातील जलतरणपटूंचे नुकसान झाले. राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सरावाला परवानगी मिळाली. परवानगी मिळूनही शहरातील निम्म्याहून अधिक जलतरण तलाव नादुरुस्त अथवा बंद असल्यामुळे शहरातील खेळाडूंना सराव कारण्यासाठी खासगी तलाव अथवा खुल्या तलावांचा पर्याय स्वीकारावा लागला. यामुळे कोल्हापूरमधील ३०० हून अधिक जलतरणपटूंना विविध वयोगटात स्पर्धेची तयारी करण्यासाठी अन्य पर्याय स्वीकारावे लागले.
शहरात यापूर्वी विविध स्पर्धा होत असताना पाच वर्षांहून अधिक काळ जलतरण स्पर्धा झाली नव्हती. अखेर स्पर्धाना सुरुवात होऊन याचे फलित म्हणून अखेर हंगामाचा शेवट हा जलतरण स्पर्धेने झाला. स्पर्धेत २५० खेळाडू सहभागी झाले. दोन दिवस या स्पर्धा होऊन विविध वयोगटातील स्पर्धक यशस्वी झाले.

कोट
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीने जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. खेळाडूंच्या मोठ्या सहभागानेच या स्पर्धेचे यश दिसून येते. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा सुरु ठेवण्याचा मानस असून अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग स्पर्धेत वाढावा यासाठी समिती प्रयत्नशील राहील.
- रमेश मोरे, समिती सदस्य

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70474 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top