
कोजिमाशि पतसंस्था निवडणूक
31197
गडहिंग्लज : स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचार प्रारंभनिमित आयोजित मेळाव्यात बोलताना दादा लाड. शेजारी जे. बी. बारदेस्कर, विनोद नाईकवाडी, आर. एस. पाटील आदी.
‘कोजिमाशी’ राजकीय व्यक्तीच्या ताब्यात नको
दादा लाड; गडहिंग्लजला स्वभिमानी सहकार आघाडीचा प्रचार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : आगामी पाच वर्षांत व्याजाचा दर एक अंकी ठेवून एक हजार कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प आहे. सभासदांचा ऐच्छिक मेडिक्लेम विमा उतरवण्यासह सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जातील. मात्र कोजिमाशी ही संस्था कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या ताब्यात देऊ नका, असे प्रतिपादन कोजिमाशी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व शिक्षक नेते दादा लाड यांनी केले.
कोजिमाशी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणातील सत्तारुढ स्वाभिमानी सहकार आघाडीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी आयोजित सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. साधनाचे संस्थापक सचिव जे. बी बारदेस्कर, विनोद नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. लाड म्हणाले, ‘‘पूर्वी तीन कोटी ठेवी असलेल्या कोजिमाशीत सध्या ५१० कोटी ठेवी आहेत. कर्जमुक्तीची योजना पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम आम्ही राबवली. इतर बँकांच्या ठेवी व व्याज दराच्या तुलनेत कोजिमाशीचा दर कमी आहे. शिक्षकांच्या डीसीपीएस प्रश्नाबाबत चौदा शिक्षक आमदारांची भव्य शिक्षण परिषद घेणार आहे.’’
श्री. बारदेस्कर म्हणाले, ‘‘दादा लाड यांचे नेतृत्व शक्तीशाली असून त्यांच्या पाठीशी सभासदांनी ताकदीने उभे रहावे. श्री. नाईकवाडी यांनी कोजिमाशीने सामाजिक बांधीलकी ठेवून प्रगती केल्याचे सांगितले.’’ या वेळी एस. एन. घोडके, मुख्याध्यापक आर. एस. पाटील, उमेदवार सचिन शिंदे, प्राचार्य श्रीकांत पाटील यांची भाषणे झाली. रफिक पटेल यांनी प्रास्ताविक केले. व्ही. आर. पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले. प्राचार्य टी. पी. पाटील, कैलास सुतार, संजय भांदुगरे, सदाशिव देसाई, सुरेश थरकार, नामदेव घोलप, बजरंग गरूड, अनिल हलकर्णीकर, विश्वास रेडेकर, प्राचार्य जे.डी. वडर, प्राचार्य जी एस शिंदे, व्ही. डी. चव्हाण, संजय देसाई, अनिल नाईक, शाफीया इनामदार, जी. आर. चोथे आदींसह सभासद उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70476 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..