ठाकरे यांच्या समर्थनात आजऱ्यात घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे यांच्या समर्थनात आजऱ्यात घोषणाबाजी
ठाकरे यांच्या समर्थनात आजऱ्यात घोषणाबाजी

ठाकरे यांच्या समर्थनात आजऱ्यात घोषणाबाजी

sakal_logo
By

31132
आजरा : येथील संभाजी चौकात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एकत्र आलेले शिवसैनिक.

ठाकरे यांच्या समर्थनात
आजऱ्यात घोषणाबाजी
आजरा : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आजरा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत पाठींबा दर्शविला. राज्यातील घडामोडीकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे शिवसैनिकांची अस्वस्था वाढली होती. त्यामुळे शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक रस्त्यावर आले. त्यांनी संभाजी चौकात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, शिवसेना शहरप्रमुख ओंकार माद्याळकर, युवासेना चिटणीस कृष्णा पाटील, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, युवासेना तालुका समन्वयक राजकुमार भोगण, संजय येसादे, सागर नाईक, संकेत देसाई, सिध्दार्थ हसबे, गुंडू खेडेकर, रोहित शेंडे, शरद कोरगावकर, प्रथमेश खोत, शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70483 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top