
हिल रायडर्सची पन्हाळा-पावनखिंड मोहिम
हिल रायडर्सची पन्हाळा
पावनखिंड मोहीम २ जुलैला
कोल्हापूर, ता.२६ : हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनतर्फे २ आणि ३ जुलै, १७ ते २४ जुलै आणि ३० आणि ३१ जुलै अशी किल्ले पन्हाळा ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम आयोजित केल्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले.
३८ वर्षे मोहिमेचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी कधी दोन, तर कधी तीन मोहिमांचे आयोजन केले. संस्थेतर्फे पायलट ट्रेकचे आयोजन केले होते. लांबून सहभाग नोंदवून शिवप्रेमी येतात. मोहिमेत दोन नाश्ता, चहा-बिस्कीट, तीन वेळा जेवणाची सुविधा आहे. मुक्कामाची सोय अंबर्डे तर्फ आंबेवाडीत करण्यात येईल. वाड्या वस्तीवरील गरजू मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल. आरोग्य सेवाही देण्यात येणार आहे. प्रारंभ पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यापासून होईल. मोहीम भग्न नंदी, तुर्केवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, कळकेवाडी, रिंगेवाडी, पाटेवाडी, सुकाळमाळ, मानचा धनगरवाडा, पांढरेपाणी, मालाई धनगरवाडी, पावनखिंड मार्गावरून जाईल. मोहिमेचा सांगता भाततळी येथील सुखाई मंदिर येथे होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70511 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..