राजर्षी शाहू पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू पुरस्कार वितरण
राजर्षी शाहू पुरस्कार वितरण

राजर्षी शाहू पुरस्कार वितरण

sakal_logo
By

राजर्षी शाहू जयंती उत्सवानिमित्त
रविवारी पुरस्कार वितरण सोहळा
जिल्हाधिकारी रेखावार; उपस्थित राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने १४८ वा राजर्षी शाहू जयंती उत्सव रविवार (ता. २६) सायंकाळी ६ वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजिला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.
राजर्षी शाहू कार्य व विचार वृद्धिंगत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने सन २०२० साठी तर डॉ. जनार्दन वाघमारे यांना सन २०२२ साठी ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असेही राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रेखावार यांनी कळविले आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70539 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top