सारण गटार कचऱ्याने भरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारण गटार कचऱ्याने भरली
सारण गटार कचऱ्याने भरली

सारण गटार कचऱ्याने भरली

sakal_logo
By

31264
31265
----------
इचलकरंजीत सारण गटार भरली कचऱ्याने
दूषित पाणी नागरिकांच्या घरात; आंदोलनाच्या पावित्र्यानंतर सफाई सुरू
इचलकरंजी, ता. २३ : शहरातील टेंडर घेऊन गोळा केलेला कचरा निरामय हॉस्पिटलसमोरील सारण गटारीमध्ये टाकल्याने गटार पूर्ण तुंबली आहे. परिणामी गटारीत साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या घरात येत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भागातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेप व पालिका प्रशासनाने सफाईचे काम सुरू केल्याने आंदोलन स्थगित केले.
इचलकरंजी पालिकेचे स्वच्छ भारत अभियानामध्ये चांगली कामगिरी केल्याबाबत प्रशंसा होत असताना भागातील अनेक सारण गटारी कचऱ्‍याने भरलेल्या दिसत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी आल्याने परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत नाही. मात्र पावसाचा जोर वाढल्यास गटारीमधील दूषित पाणी नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिति शहरातील सुतार मळा परिसर, निरामय हॉस्पिटलसमोरील सारण गटारीची झाली आहे. गटारीमध्ये सुमारे १० ते १२ फूट कचरा साचला आहे. त्यामुळे सारण गटारीची पाईप पूर्ण भरली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून मलेरिया, डेंगी, चिकन गुणिया, यासारखे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या भागातील अनेक लहान मुले आजारी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडे वेळोवेळी तक्रार करूनही स्वच्छता होत नसल्याने भागातील नागरिकांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. याची कल्पना लागताच भागातील लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी भेट देत पालिकेच्या अधिकाऱ्‍यांना बोलावून घेतले. कचरा काढण्यास सुरुवात केल्याने आंदोलन स्थगित केले. दरम्यान, सारण गटारीमध्ये साचलेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यां‍नी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने अखेर जेसीबी बोलवण्यात आली. अनिस म्हालदार, अमित पाल, महेश दवंडे, सबिद जमादार, सादिक पटेल आदी उपस्थित होते.
---------------
घंटागाडीमधून येणारा कचरा येथे ठेवण्यात येतो. त्या कचऱ्यामधील विक्री करण्यायोग्य वस्तू लोखंड, प्लास्टिक बॉटल अशा वस्तू वेगळ्या केल्या जातात. राहिलेला कचरा लगतच्या गटारीमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे ही गटार कचऱ्याने भरली आहे.
-द्रुवती दळवाई, माजी नगरसेविका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70699 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top