
हेमरस साखर कारखान्यातर्फे आठ लाख टनाचे नियोजन ः भरत कुंडल
31321
कोवाड ः हेमरस साखर कारखान्यात रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल व इतर.
हेमरस साखर कारखान्यातर्फे
आठ लाख टनांचे नियोजन
भरत कुंडल; रोलर पूजन उत्साहात
कोवाड, ता. २३ : ओलम (हेमरस) साखर कारखान्यातर्फे चालू गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने कारखान्याच्या मशिनरीत बदल केले जात आहेत. देखभाल दुरुस्तीच्या कामाना वेग आला असून शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊस नोंद करुन घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले आहे.
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचे रोलर पुजन भरत कुंडल यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी स्वागत केले. कुंडल म्हणाले, ‘‘गत हंगामात कारखान्यात सात लाख वीस हजार टन उसाचे गाळप झाले. हेमरसला ऊस पाठविण्याचा शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याने कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या तंत्रज्ञानाचा विस्तार वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची वाटचाल सुरू ठेवली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाची उचल व्हावी, यासाठी ५३२ वाहनांचे करार केले आहेत. २५ करार वेटिंगवर आहेत. २२ हजार ४२८ शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाची नोंद केल्याने १२ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद झाली आहे.’’ शेतकऱ्यांचा कारखान्यावर विश्वास दृढ होत असल्याचेही सांगून कुंडल यांनी कारखान्याकडून ऊस पिक वाढीसाठी सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या वेळी शशांक शेखर, युनियन अध्यक्ष संतराम गुरव, शेती विभागाचे अनिल पाटील, नामदेव पाटील, भागोजी लांडे, रंजीत सरदेसाई, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. सुधीर पाटील यांनी आभार मानले.
----------------
कोट
शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्यातर्फे ऊस पिक वाढीसंदर्भात विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जास्तीत जास्त ऊस दर व एकरकमी बिले वेळेवर अदा केली जात असल्याने हेमरसकडे शेतकऱ्यांचा ऊस पाठविण्याचा कल वाढला आहे. त्यामुळेच यावर्षी तीन हजार हेक्टर क्षेत्रातील उसाची नोंद झाली आहे.
- सुधीर पाटील, शेती अधिकारी, हेमरस
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70792 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..