पाणीपुरवठ्याबाबत कॉंग्रेसचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठ्याबाबत कॉंग्रेसचा इशारा
पाणीपुरवठ्याबाबत कॉंग्रेसचा इशारा

पाणीपुरवठ्याबाबत कॉंग्रेसचा इशारा

sakal_logo
By

31364
...तर शहरात रस्तोरस्ती आंदोलने
कॉंग्रेस, राष्ट्रवादी माजी नगरसेवकांचा इशारा; पाणीपुरवठ्याबाबत १५ दिवसांची मुदत

कोल्हापूर, ता. २३ ः पंधरा दिवसांत शहरात पाण्याचे समान वाटप, अनाधिकृत नळकनेक्शनधारक तसेच मीटर रिडर, प्लंबरवर कारवाई, रस्त्याखाली गेलेले व्हॉल्व सुरू करण्याबरोबरच कंत्राटी कामगार न घेतल्यास कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी शहरात रस्त्यारस्त्यांवर आंदोलने केली जातील, असा इशारा आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिला. पाणी असून केवळ नियोजन नसल्याने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित नसल्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी आज प्रशासकांशी चर्चा केली. या वेळी शहरातील काही भागात २४ तास पाणी, काही ठिकाणी अपुरा तर काही ठिकाणी नाहीच असा प्रकार पाणीपुरवठ्याबाबत आहे. त्यामुळे सर्वांना समान प्रमाणात पाणी मिळावे. त्यासाठी व्हॉल्व सोडण्याची पद्धत चुकीची आहे. तक्रार असेल तरच त्या भागात व्यवस्थित पाणी येते. अनेक भागात अनाधिकृत नळकनेक्शन वाढली आहेत. त्यांना ५० हजाराचा दंड करा. तेथील मीटर रिडरवर कारवाई कराच, शिवाय संबंधित प्लंबरचे लायसन्स रद्दची कारवाईही करा अशी मागणी केली.
अमृत योजनेच्या पाईप टाकल्यानंतर त्यावर नवीन कनेक्शन घेण्यास सांगावे. काहींची जुन्या लाईनवरच कनेक्शन असल्याने दोन्ही पाईप भरून राहतात. त्याचाही पुरवठ्यावर परिणाम होत आहे. डांबरी रस्त्याखाली गेलेले अनेक व्हॉल्व सुरूच आहेत. त्यामुळे पाण्याचे नियोजन होत नाही. आठ दिवसांत हे सर्व व्हॉल्व खुले करा. कर्मचारी नसल्याने मोठे व्हॉल्व सुरू-बंद करता येत नाहीत. त्यातून मुख्य वाहिन्या सुरू राहून टाकी भरण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी कर्मचारी घेऊन नेमा. अमृतमधील टाकी व पाईपलाईनसाठी वेगवेगळे कंत्राटदार असावा आदी सूचना केल्या.
या वेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, माजी महापौर हसीना फरास, निलोफर आजरेकर, संजय मोहिते, सचिन पाटील, मधुकर रामाणे, संदीप कवाळे, डॉ. संदीप नेजदार, प्रताप जाधव, प्रकाश गवंडी, श्रावण फडतारे, सुभाष बुचडे, सागर यवलुजे, दुर्वास कदम, भूपाल शेटे, अर्जुन माने, इंद्रजित बोंद्रे, विनायक फाळके दिलीप पोवार, सुयोग मगदूम, उमेश पोवार, संजय लाड उपस्थित होते.

२४ तास पाणी बंद करणार
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, ‘‘२४ तास पाणीपुरवठा सुरू राहणाऱ्या भागातील व्हॉल्व बंद करणार, जिथे व्हॉल्व नाहीत तिथे नवीन बसवणार, पाणी सोडणाऱ्यांना बंद-सुरूचे नियोजन करून देण्यात येईल. त्याची जबाबदारी पाणी सोडणारे व कनिष्ठ अभियंत्यावर निश्‍चित केली जाणार आहे. आपटेनगर टाकी भरून घेण्याचे नियोजन करून उपनगरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. रस्त्याखाली गेलेले व्हॉल्व सुरू करण्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल. अमृतमधील नवीन पाईपवरच कनेक्शन ठेवण्याचे आदेश देऊ.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y70852 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top