
पालिका निवडणूक मतदार संख्या
मतदार यादी अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू
इचलकरंजी महापालिका; ३२ प्रभागांत २ लाख ३७ हजार ४३१ मतदार संख्या निश्चित
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २४ ः येथील पुढील सार्वत्रिक निवडणूक महापालिका की पालिका म्हणून होणार याबाबत अद्यापही अनिश्चीतता आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पुढील निवडणूक महापालिकेची होणार ही शक्यता गृहीत धरून मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात एकूण ३२ प्रभागांसाठी २ लाख ३७ हजार ४३१ इतकी मतदार संख्या निश्चित केली आहे. यामध्ये तब्बल ५४ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे.
विद्यमान सभागृहाची मुदत संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्यादृष्टीने आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना निश्चित केली. आता प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. इचलकरंजी महापालिका होणारच अशी हमी नेतेमंडळींनी दिल्याने इच्छुकांचा या प्रक्रियेतील सहभाग कमी झाल्याचे दिसून येत आहे. प्रारुप प्रभाग रचना अंतिम करताना याची झलक पाहावयास मिळाली नाही. याबाबत एकही हरकत दाखल झाली नाही.
आता प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. यापूर्वीच प्रशासनाकडून १ के ३२ प्रभागातील मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन केले आहे. त्याची मुदत १ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर आलेली हरकतीची कोणतीची दखल घेणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. पालिकेच्या निवडणूक विभागात सर्व प्रभागातील मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे याबाबत किती हरकती व सूचना दाखल होणार याबाबत उत्सुकता आहे.
मतदार संख्या दृष्टिक्षेप
एकूण मतदार - २,३७,४३१
पुरुष - १,२२,९९३
स्त्री - १,१४,३८४
इतर - ५४
कमी मतदार संख्या ५११२ तर सर्वाधिक ९०७५
सर्वाधिक कमी ५११२ इतकी कमी मतदार संख्या प्रभाग १ मध्ये आहे. तर सर्वाधिक ९०७५ ही मतदार संख्या प्रभाग २४ मध्ये आहे. प्रभाग १ मध्ये खंजिरे इस्टेट, सावली सोसायटी व योगाश्रम परिसराचा समावेश आहे. तर प्रभाग २४ मध्ये विवेकानंद कॉलनी, कलानगर, बंडगर माळ परिसराचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71198 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..