मारहाण, अपघात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण, अपघात अटक
मारहाण, अपघात अटक

मारहाण, अपघात अटक

sakal_logo
By

इचलकरंजी : येथील पंचगंगा पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात बसप्पा बिदरगड्डी (रा. कोरोेची) यांचा एकाचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पलायन केलेल्या दुचाकीस्वारास गावाभाग पोलिसांनी अटक केली.विनायक महादेव दगडे (वय 37, रा. शाहुनगर, रेंदाळ, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव. कोरोेची (ता. हातकणंगले) येथील फिरोज पेंढारी आणि त्यांच्या शेजारी राहणारे बसप्पा बिदरगड्डी, विरुपाक्ष कोष्टी हे तिघे 21 जुनला शिरदवाडला जेवायला गेले होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतत असताना पंचगंगा पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला ठोकरून वाहनचालकाने पलायन केले होते. या अपघातात तिघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान बसप्पा बिदरगडी यांचा मृत्यू झाला होता. तर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गावभाग पोलिसांनी गतीने तपास सुरू केला होता. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रेंदाळमधून संशयीत विनायक दगडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता अपघात झाल्याची कबुली दिल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
- - - - - - - - - - - - - - - -
इचलकरंजी, ता.२४ : तारदाळ ( ता. हातकणंगले) येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटण्याच्या इराद्याने डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण केली.मागाच्या माऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी तीन अज्ञात मारेकऱ्यांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद तुकाराम रामचंद्र कुंभार (वय २७ रा.आझाद नगर ,तारदाळ ) यांनी दिली आहे. ही गुरुवारी (ता.२३) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम यांचे आझादनगर येथे सराफ दुकान आहे. गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी जात असताना दोन ते तीन जणांनी त्यांना गाठले. पाठीमागून येवून त्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकली. तसेच त्यांच्या पाठीवरील असलेली सॅक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात लाकडी मागाच्या माऱ्याने मारहाण करून जखमी केले.तुकाराम यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर भागातील नागरिक जमा झाले.त्वरित मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादीनुसार तीन अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- - - - - - - - - - - -

जयसिंगपूर, ता.२३: राहत्या घराच्या हॉलमध्ये झोपलेल्या वडीलांनी लाईट बंद केली नाही म्हणून मुलाने व सुनेने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दानोळी (ता.शिरोळ) येथे गुरूवारी दुपारी घडली आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात शशिकांत दत्तु पिसे (रा.महादेव मंदिरजवळ दानोळी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शशिकांत पिसे हे गुरूवारी दुपारी राहत्या घरातील हॉलमध्ये लाईट बंद न करता झोपले होते. त्याचवेळी त्यांचा मुलगा रविंद्र शशिकांत पिसे व त्याची पत्नी जयश्री रविंद्र पिसे आले असता. लाईट चालू स्थितीत पाहून वडील शशिकांत यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. यामध्ये शशिकांत हे जखमी झाले आहेत.

जयसिंगपूर, ता.२४: पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल युज प्लास्टिक विरोधी पथकाने बुधवारी शहरातील विविध भागातील 22 दुकानावर कारवाई केली. या कारवाईत शहरातील 5 दुकानातून सिंगल युज प्लॅस्टिक तसेच पॅकींगसाठी वापरणेत येणारे प्लॅस्टीक पिशवी अशा विविध प्रकारच्या 18 किलो प्लॅस्टीक वस्तू जप्त करुन 5 दुकाने सिल करणेत आली आहेत. सदरच्या कारवाईवेळी नगरपरिषदेचे सिंगल युज प्लॅस्टिक बंदी बाबतचे नोडल ऑफिसर जमीर मुश्रीफ, स्वच्छता निरीक्षक संदिप कांबळे, शहर समन्वयक प्रसाद भोसले, रविंद्र कांबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.शहर सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त व्हावे याकरीता कारवाईची धडक मोहिम प्रभावीपणे राबविणेत येणार आहे. शहरातील व्यापारी व नागरीकांनी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर बंद करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक तैमूर मुलाणी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71251 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..