केर्ली खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केर्ली खून
केर्ली खून

केर्ली खून

sakal_logo
By

३१७५८
सशस्त्र हल्ल्यात केर्लीतील तरुणाचा मृत्यू
सोनतळी परिसरात घटना; ‘सावकार’ म्हटल्याचा राग; मित्रावर खुनाचा गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
प्रयाग चिखली, ता. २५ ः सोनतळी (ता. करवीर) येथे काल रात्री झालेल्या सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना सीपीआरमध्ये आज सकाळी मृत्यू झाला. भरत शंकर नाईक (वय २९, केर्ली, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अटक केलेल्या मित्रावर करवीर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला. संदीप बापू माने (३६, रा. सोनतळी, करवीर) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, भरत नाईक यांचे लक्षतीर्थ वसाहतीत घर आहे. गंवडी कामासाठी केर्ली (ता. करवीर) येथे भाडेकरू म्हणून राहत होते. काल रात्री साडेआठच्या सुमारास भरत हे सोनतळी येथे पैसे मोजत उभे होते. त्या वेळी त्यांचा मित्र संशयित संदीप मानेने ‘सावकार’ असे म्हटले. यावरून दोघांत वाद झाला. वाद मिटविण्यासाठी भरत यांना मानेने त्याच्या घराजवळ बोलवून घेतले होते. त्यावेळी भरत यांच्यावर मानेने चाकूने हल्ला केला. यामध्ये त्यांच्या पोटावर व मानेला गंभीर दुखापत झाली. गोंधळामुळे परिसरातील नागरिक जमले. त्यांनी जखमी भरत यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले.
दरम्यान, याप्रकरणी संशयित मानेला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल केला. दरम्यान उपचार सुरू असताना भरत नाईक यांचा सीपीआरमध्ये आज सकाळी मृत्यू झाला. त्यानुसार संशयित मानेवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे करीत आहेत. मृत भरत नाईक यांच्या मागे आई आणि भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71313 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..