रंग- शिल्पसौंदर्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंग- शिल्पसौंदर्य
रंग- शिल्पसौंदर्य

रंग- शिल्पसौंदर्य

sakal_logo
By

शिल्पसौंदर्य
31724
........
कोल्हापूर ः राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील राजर्षी शाहूंचा भव्य पुतळा.
..........
मार्केट यार्डातील
राजर्षींचे भव्य शिल्प
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या चांगल्या शिल्पामधील हे एक उंच आणि अत्यंत सुंदर शिल्प. शाहू मार्केट यार्डमधील महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून दिसत असला तरी तो जवळ जाऊनच पहायला हवा. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश केला, की हे शिल्प पहायला मिळते. अत्यंत सुरेख आणि प्रमाणबद्ध असणारे हे शिल्प साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते. जिल्ह्यात हरितक्रांती आणणाऱ्या या युगपुरुषाचे हे यथोचित स्मारक उभारताना समाजमनाबरोबरच शिल्पकाराच्या मनामध्ये स्फुरलेला उत्साह या शिल्पात शिल्पांकित झाला आहे. १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर दिमाखदारपणे हे शिल्प स्थापित आहे. उजव्या हातामध्ये खलिता पकडून डावा पाय पुढे टाकत चाललेल्या शाहू महाराजांची एखाद्या पहाडासारखी उंच खडी प्रतिमा आपल्या अंगावर काटा आणते. आपल्या या कर्तृत्ववान राजाचा गगनाला भिडणारा पुतळा जरी बनवला तरी तो देखील कमीच आहे. शाहू महाराजांच्या पुतळ्याची उंची किती असावी, याला मर्यादा त्या काय?
डावा पाय पुढे टाकत रुबाबात चालत जाणारे शाहू. त्यांच्या अंगावरील ते क्वचितच वापरत असे समारंभप्रसंगी वापरायचे वस्त्र असून, ते वेगवान वाऱ्याने उडालेले दाखवले आहे. त्यामुळे या शिल्पाला विलक्षण गती लाभली असून, महाराजांच्या अंगावर तत्कालीन पारंपरिक पोशाख आणि त्याची चालण्याच्या वेगामुळे निर्माण झालेली अवकाशाची स्थिती शिल्पकारांनी अतिशय उत्कृष्ट साकारली आहे. महाराजांचा देखणा फेटा असणारा भारदस्त चेहरा व करारी नजर यांचा सुरेख मिलाफ या शिल्पात पाहता येतो. कमरेला डाव्या बाजूला तलवार असून तो हात मात्र त्यापासून विलग दाखवणे हे एक काळाला योग्य ठरणारे विवेकमूल्य शिल्पामध्ये खूप काही सांगून जाते. पुतळ्याच्या आकाराच्या मानाने केलेले ठळक उठावदर्शक काम आणि कामातील कमी-अधिक खोलीच्या खाचा-खुचा या पुतळ्याला विलक्षण प्रभावी बनवतात. त्या काळातील वास्तवादी शिल्पकलेचे एवढे भव्य काम आकारास येताना अनेक अडचणींवर मात करत थोर शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी ही कलाकृती सर्व बाजूने परिपूर्ण साकारली आहे. ३० डिसेंबर १९६९ रोजी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमामध्ये या स्मारकशिल्पाचे अनावरण भारताचे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71383 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top