इचल ः चव्हाण पॉलिटेक्निक मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः चव्हाण पॉलिटेक्निक मानांकन
इचल ः चव्हाण पॉलिटेक्निक मानांकन

इचल ः चव्हाण पॉलिटेक्निक मानांकन

sakal_logo
By

-----------
या बातमीच्या उपशीर्षकामध्ये ‘अभियांत्रिकीच्या सहा शाखांचा समावेश’ असा उल्लेख आहे.
मात्र लीड मध्ये पाच शाखांची नावे आहेत. कृपया पाहावे.
- धनसरे
-------------


३१७४६

यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकला मानांकन
‘डीकेटीई’ संस्थेची गुणवत्ता; अभियांत्रिकीतील सहा शाखांचा समावेश
इचलकरंजी, ता. २५ ः येथील ‘डीकेटीई’च्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या सर्व अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडेशन (एनबीए) समितीकडून तीन वर्षांसाठी मानांकन प्राप्त झाले आहे. ‘पॉलिटेक्निक’मधील सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सर्व शाखांना एकाचवेळी मानांकन मिळाले आहे.
‘एनबीए’ ही राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमांना मानांकन देण्याचे काम करते. सहासदस्यीय समितीने यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकची शिक्षण प्रणाली, सेवा-सुविधा, प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता व उपलब्धता विभागस्तरावरील कागदपत्रांची तपासणी केली होती. यात टीचिंग अ‍ॅन्ड लर्निंग प्रोसेस, रिसर्च अ‍ॅन्ड कन्सल्टन्सी, स्टूडंट सक्सेस रेट, करिअर गाईडन्स, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांचा फीड बॅक, आऊटकम बेस्ड एज्युकेशनचे मूल्यमापन केले. पॉलिटेक्निकच्या वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज, मध्यवर्ती ग्रंथालय, वसतिगृहांची पाहणी केली.
पॉलिटेक्निकने स्थापनेपासूनच सर्वांगीण प्रगती साधली आहे. दर्जेदार तंत्रशिक्षण देण्याबरोबरच पायाभूत सुविधा, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि भविष्यातील प्रगतीकरिता आवश्यक असणारे संशोधन या बाबींवर भर दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे आणि व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनामुळे मानांकन प्राप्त झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. यासाठी ऑनररी सचिव डॉ. सपना आवाडे, प्राचार्य प्रा. अभिजित कोथळी, उपप्राचार्य आणि ‘एनबीए’ समन्वयक प्रा. बी. ए. टारे, ‘डीकेटीई’चे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे आदींचे सहकार्य लाभले.

कोट
‘डीकेटीई’ संस्थेने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण पदविकेचे द्वार खुले करीत ‘पॉलिटेक्निक’ची सुरवात झाली. ‘एनबीए’ मानांकनाने पॉलिटेक्निकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
- कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थाध्यक्ष

‘डीकेटीई’ ब्रँड सिद्ध
१९८२ मध्ये स्थापन झालेल्या ‘डीकेटीई’ने अभियांत्रिकी शिक्षणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची मोहोर उमटविली आहे. ‘डीकेटीई’ची गुणवत्ता मानांकनाने पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ‘पॉलिटेक्निक’मधून कुशल तंत्रज्ञ म्हणून पदविका प्राप्त अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी देश आणि परदेशांतील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71417 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top