श्रीराम सोसायटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम सोसायटी
श्रीराम सोसायटी

श्रीराम सोसायटी

sakal_logo
By

३१७७३
‘श्रीराम’मध्ये सत्ताधाऱ्यांचा एकतर्फी विजय
विरोधकांचा धुव्वा; विजयानंतर पालकमंत्र्यांच्या समर्थकांचा जल्लोष
कसबा बावडा, ता. २५ ः तब्बल दहा वर्षांनी निवडणूक लागलेल्या येथील श्रीराम विकास सोसायटीच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत सत्तारूढ गटाने एकतर्फी विजय मिळवला. निवडणुकीत विरोधी पॅनेलचा धुव्वा उडाला. निकालानंतर उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाकांच्या आतषबाजी करून एकच जल्लोष केला. या निकालाने पालकमंत्री सतेज पाटील यांचे या परिसरातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
संचालक पदाच्या १७ जागांसाठी ही निवडणूक झाली. भटक्या विमुक्त गटातून ‘सत्तारूढ’चे दत्ता मासाळ बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित १६ जागांसाठी आज संस्थेच्या मंगल कार्यालयात चुरशीने मतदान झाले. एकूण ५ हजार ९३४ मतदारांपैकी ४ हजार ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान सुरू झाल्यापासून स्वतः पालकमंत्री पाटील मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून होते. मतदान शांततेत झाले. मतदानानंतर याच कार्यालयात मतमोजणी झाली. त्यात सत्तारूढ गटाच्या सर्वच संचालकांनी एक हाती विजय मिळवला.
पालकमंत्री पाटील यांनी सत्तारूढ गटातून विद्यमान १४ संचालकांना डच्चू दिला होता. उमेदवारीवरून असलेली नाराजी टाळण्यासाठी दोन दिवसांपासून त्यांनी याच परिसरात तळ ठोकला होता. त्यांच्या या प्रयत्नांना निकालात यश आले. विजयी झालेल्या उमेदवारांत तीन विद्यमान संचालकांचा समावेश आहे; तर १४ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

पालकमंत्र्यांचे वर्चस्व कायम
दोन निवडणुकाप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री पाटील यांचे प्रयत्न सुरू होते; पण त्याला यश न आल्याने निवडणूक लागली. त्यातच राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाल्याने श्री. पाटील यांना या निवडणुकीत फारसे लक्ष घालता आले नाही; पण दोन दिवसांपासून त्यांनी बावड्यात ठाण मांडून नाराजांची नाराजी दूर केली. त्याचा परिणाम निकालात दिसला. यावरून या परिसरावरील त्यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले.

विजयी उमेदवार व त्यांना मिळलेली मते ः
सर्वसाधारण गट ः मारुती तुकाराम पाटील- ३०९८, उमाजी उलपे- ३०७८, मिलिंद पाटील- ३०५३, हिंदूराव ठोंबरे- ३०५१, धनाजी गोडसे ३०३०, संतोष पाटील- ३०१७, रमेश रणदिवे- ३०१६, युवराज उलपे- २९८६, तानाजी बिरंजे- २९६४, अनंत पाटील- २९५०, विलास वाडकर- २८६१, राजीव चव्हाण- २८१०. महिला प्रतिनिधी गट ः शीतल पाटील- ३४१०, सविता रणदिवे- ३२५४, अनुसूचित जाती प्रतिनिधी - सुभाष गदगडे- ३३१२, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - पुर्णेंदू गुरव- ३२२७, भटक्या विमुक्त गट - दत्ता मासाळ (बिनविरोध).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71440 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..