मूर्तीकारांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्तीकारांना मारहाण
मूर्तीकारांना मारहाण

मूर्तीकारांना मारहाण

sakal_logo
By

३१७११

परप्रांतीय मूर्तिकारांना मारहाण
रुईकर कॉलनीसमोर प्रकार; अनोळखींचे कृत्य; २५ हजारांचे नुकसान
कोल्हापूर, ता. २५ ः रुईकर कॉलनीसमोरील परप्रांतीय मूर्तिकारांना आज सकाळी अनोळखींनी काठीने मारहाण केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रुईकर कॉलनीसमोर गेली अनेक वर्षे मूर्तिकार वास्तव्यास आहेत. ते मूर्ती तयार करून विक्री करून उपजीविका करतात. येथील मूर्तिकार आज सकाळी काम करत होते. दरम्यान, अनोळखी पुरुष आणि महिलांसह सात ते आठ जणांनी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून जागा खाली करा, असे सांगण्यात येत होते. ओरडण्यामुळे गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओही ‘व्हायरल’ झाला. याची माहिती मिळताच घटनास्थळी शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मारहाणीत एक तरुण जखमी झाला असून २० ते २५ हजारांच्या साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी महिला पोलिसांकडे करत होत्या. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71449 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..