इचल ः धैर्यशील माने मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः धैर्यशील माने मागणी
इचल ः धैर्यशील माने मागणी

इचल ः धैर्यशील माने मागणी

sakal_logo
By

प्रोत्साहन अनुदानाचे
जाचक निकष बदला
खासदार माने; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
इचलकरंजी, ता. २५ ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून पूरबाधित शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शासनाच्या सुधारित आदेशात असे शेतकरी लाभापासून वंचित राहणार असून त्यांच्यावर अन्याय होणार आहे, असे श्री. माने यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
२०१९ मध्ये महापुरात सर्वाधिक नुकसान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. सातारा, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, नगर, अमरावती, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांनाही महापुराचा फटका बसला होता. तेथील शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंत पीककर्ज व ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतचे व्याज माफ केले होते. मात्र आताच्या कर्जमाफीच्या यादीतून या शेतकऱ्यांना वगळले आहे. सुधारित त आदेशात या शेतकऱ्यांना दुबार लाभ देणे उचित होणार नाही. मृत शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करू नये, असे स्पष्ट केल्याने हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.
शासनाने प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे निकष लावताना प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी केली आहे. त्यानुसार सर्व प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक असून त्यासंदर्भात पूर नुकसान भरपाईचा निकष लावणे योग्य होणार नाही. महापुरामुळे पूरग्रस्त शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. एखादा शेतकरी कर्जदार सभासद मृत झाल्याने त्याच्या कर्जाची परतफेड वारसांनी केलेली आहे. त्यामुळे वारसांना अनुदानापासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. अटी शिथिल करून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी श्री. माने यांनी पत्रात केली आहे.

कोट
कोल्हापूर व सांगलीसह सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी नियम व शिथिल कराव्यात व अनुदानाचा लाभ द्यावा.
धैर्यशील माने, खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71456 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top