टुडे १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे १
टुडे १

टुडे १

sakal_logo
By

31775
इचलकरंजी : महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना यंत्रमागधारक जागृती संघटनेचे पदाधिकारी.


पोकळ थकबाकीचा प्रश्न लटकला
राजकीय परिस्थिती स्थिर होईपर्यंत कारवाई नको; यंत्रमागधारकांचे महावितरणला साकडे


इचलकरंजी, ता. २५ ः राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे यंत्रमागधारकांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीचा प्रश्न तूर्तास तरी लटकला आहे. महावितरणकडून पोकळ थकबाकी न भरल्यास वीज कनेक्शन खंडित करण्याचा इशारा दिला, या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या शिष्टमंडळांने महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना निवेदन देऊन राजकीय परिस्थिती स्थिर होईपर्यंत कोणतीच कारवाई करु नये, असे साकडे घातले.
ऑनलाईन नोंदणीसाठी राज्य शासनाकडून दोन महिने २७ एचपीवरील यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद केली होती. नंतर मात्र ही वीज सवलत पूर्वलक्षी प्रभावाने कायम केली. दोन महिन्यांच्या वीज बिलात सवलत लागू नसलेली रक्कम महावितरणने थकबाकी म्हणून दाखवली आहे. ही थकबाकी रद्द करण्याचे पत्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागांने महावितरण कंपनीस दिले आहे. पण त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे दोन महिन्याच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. यंत्रमागधारक संघटनांकडून हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा सुरू केला होता. पण पाच-सहा दिवसांपासून शिवसेना अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. जोपर्यंत राजकीय परिस्‍थिती पूर्वपदावर येत नाही, तो पर्यंत हा प्रश्न मार्गी लागणे अशक्य आहे. तर दुसरीकडे वीजपुरवठा खंडित होण्याची संबंधित यंत्रमागधारकांत भीती आहे. या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारक जागृती संघटनेच्या शिष्टमंडळांने महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. राठी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विनय महाजन, सूरज दुबे, प्रवीण कदम, उमेश लाड, मोहन ढवळे, महेश दुधाणे, राहुल चिखलगे, माधव ढवळे, सचिन मांगलेकर आदी उपस्‍थित होते.

कोट
``सध्‍या परिस्‍थितीमुळे संबंधित यंत्रमागधारकांनी मागील पोकळ थकबाकी वगळून फक्त चालू वीज बिल भरावे.``
- प्रशांत राठी, कार्यकारी अभियंता, महावितरण, इचलकरंजी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71473 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top