रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू
रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

sakal_logo
By

दूध पावडरची पोती चोरताना
हेरवाडच्या तिघांना पकडले
कुरुंदवाड ः हेरवाड (ता. शिरोळ) येथील शेडचे पत्रे उचकटून दूध पावडरची पोती चोरून नेताना पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून पावडरची सहा पोती व तीन मोटारसायकली जप्त केल्या. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हेरवाड (ता. शिरोळ) गावच्या हद्दीतील शेती गट नंबर ४८३ मध्ये महादेव भीमू धरणगुत्ते यांचे पत्र्याचे शेड आहे. शेडमधून शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी अकराच्या दरम्यान सुभाष विलास माने (वय २०), विनायक सदाशिव चिंचणे (२१) व प्रवीण आनंदा माने (तिघेही हेरवाड) यांनी शेडचे पत्रे उचकटून ३७ हजार ५०० रुपयांची दुधाच्या पावडरीची सहा पोती मोटारसायकल (एमएच ०९ डीडब्ल्यू ६५२१), एमएच ०९ सीवाय ९५६९ व एमएच ०९ एफएक्स ३७७५ वरून चोरून नेत असताना पकडले. चोरीची फिर्याद महादेव धरणगुत्ती यांनी येथील पोलिसांत दिली आहे. तपास पोलिस नाईक अरुण नागरगोजे करीत आहेत.

इचलकरंजीत दिवाणजीची आत्महत्या
इचलकरंजी : यंत्रमाग कारखान्यातील दिवाणजीने गोदामात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शंभूदयाल रामनारायण राजपुरोहित (वय ३४, बोहरा मार्केट, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. तारदाळ (ता. हातकणंगले) येथील गोदामात तिसऱ्या मजल्यावर लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने दिवाणजीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद अशोक कल्याणमल राजपुरोहित यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

बेवारस वृद्धाचा मृतदेह
कोल्हापूर ः जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात वृद्धाचा मृतदेह मिळून आला. त्यांचे अंदाजे वय ७० वर्षे आहे. ते अंगाने मध्यम, चेहरा गोल, रंग गोरा असून त्यांची उंची पाच फूट पाच इंच आहे. त्यांनी अंगात पांढरा फूल शर्ट, गुलाबी रंगाची हाफ पॅन्ट परिधान केली आहे. याबाबत माहिती मिळाल्यास नातेवाईकांनी कोल्हापूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अमलदार सदाशिव पाटील यांनी केले.

आलासमधून बालकाचे अपहरण
कुरुंदवाड ः आलास (ता. शिरोळ) येथील गोविंद सचिन कांबळे (वय १२) याला अज्ञाताने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची फिर्याद माया सचिन कांबळे यांनी येथील पोलिसांत दिली आहे. १९ जूनला सकाळी नऊच्या सुमारास गोविंद सचिन कांबळे घरातून कोणास काही न सांगता निघून गेला. तो अद्यापपर्यंत घरी परत आला नाही. पै-पाहुण्यांकडे चौकशी केली असता तो मिळून आला नाही. त्याला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71477 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..