
पत्रकारिता विद्यार्थ्यांचा गौरव
३१७९०
पत्रकारितेतील विद्यार्थ्यांचा गौरव
शाहू कृतज्ञता पर्वात योगदान; जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रमाणपत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज ‘कृतज्ञता पर्व’ साजरे झाले. या लोकोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीत योगदान दिले. याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
उपक्रमामध्ये बी. जे., एम. जे., मास कम्युनिकेशन आणि पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम आदी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात नियोजनाच्या बैठका झाल्या. बैठकीला पत्रकारिता विभागातील डॉ. शिवाजी जाधव, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट व जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ''प्रसिद्धी टीम'' तयार करून विविध कार्यक्रमांच्या प्रसिद्धीचे नियोजन केले. विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयासोबत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांचे कव्हरेज केले. यासाठी पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव यांचे सहकार्य मिळाले. कृतज्ञता पर्व उपक्रमांतर्गत त्या त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, कार्यक्रम बातम्या, विशेष वृत्त, ऑडिओ व्हिडिओ वृत्तसंकलन आदी माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे विविध उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. कृतज्ञता पर्व प्रसिद्धी कार्यात विद्यार्थी व पत्रकारिता विभागाचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळाले. असे सांगून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शासकीय जनसंपर्क व प्रसिद्धी व्यवस्थेची माहिती देण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71512 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..