क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम
क्राईम

क्राईम

sakal_logo
By

रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः मार्केट यार्ड परिसरात रेल्वे खाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. सुनील आहरेवाडी (वय ३२, रा. दक्षिण सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना २१ जून रोजी सकाळी उघडीस आली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आहेत. ही आत्महत्या असल्याचा संशय असून त्या अनुषंगानेही तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस अमंलदार सदाशिव पाटील यांनी सांगितले.

२६७६

उचगावच्या बेपत्त तरुणाचा मृतदेह
उजळाईवाडी ः उचगाव येथील तरुणाचा विमानतळ कंपाउंडजवळील विहिरीमध्ये बुडू मृत्यू झाला. पवन सुनील हजारे (वय २८, प्लॉट नंबर ५० गणेश कॉलनी, गणेश मंदिरजवळ, उंचगाव ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना आढळला. मधुसूदन शरद वरुटे (मनेरमाळा) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांत वर्दी दिली. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पवनचा उंचगाव येथे लॉन्ड्रीचा व्यवसाय असून बुधवार (ता. २२ जून) पासून तो बेपत्ता होता. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल इदे करीत आहेत.

तरूण पडून जखमी
कोल्हापूर ः हरीओमनगर येथे सेंट्रींग काम करत असताना पडून तरुण जखमी झाला. ओमप्रकाश सिंग (वय २२, रा. आर.के.नगर परिसर) असे त्यांचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71526 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top