गांधी, नेहरू, आंबेडकरांना विरोधक भासविण्याचा प्रयत्न डॉ. प्रकाश पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी, नेहरू, आंबेडकरांना विरोधक भासविण्याचा प्रयत्न
डॉ. प्रकाश पवार
गांधी, नेहरू, आंबेडकरांना विरोधक भासविण्याचा प्रयत्न डॉ. प्रकाश पवार

गांधी, नेहरू, आंबेडकरांना विरोधक भासविण्याचा प्रयत्न डॉ. प्रकाश पवार

sakal_logo
By

31802
गडहिंग्लज : समता परिषदेतर्फे झालेल्या चर्चासत्रात बोलताना डॉ. प्रकाश पवार. व्यासपीठावर जे. बी. बारदेस्कर, प्रमोद मुजुमदार, प्रा. सुभाष कोरे, संपत देसाई.

गांधी, नेहरू, आंबेडकरांना
विरोधक भासविण्याचा प्रयत्न
डॉ. प्रकाश पवार; गडहिंग्लजला चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : देशातील जात, धर्म, वर्ग आणि संस्कृतीचे आकलन महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु व बाबासाहेब आंबेडकर यांना होते. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाऐवजी भारतीय म्हणून समाजाकडे पाहिले आहे. परंतु, हिंदुत्वापेक्षा वेगळा विचार सांगणाऱ्या या तिघांनाच जाणीवपूर्वक एकमेकांचे वैचारिक विरोधक भासवण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात त्यांच्या विचारांची मांडणी होवून राजकारणाचा नवा प्रवाह येईल, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी केले.
येथील सलोखा परिषदेतर्फे प्रमोद मुजुमदार लिखित हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा या पुस्तकावर चर्चासत्र झाले. याप्रसंगी डॉ. पवार बोलत होते. प्राचार्य जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी होते. नगरपालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘हिंदुत्त्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी गांधी, नेहरु आणि आंबेडकरांच्या विचारांची नव्याने मांडणी झाली पाहिजे. त्याची मांडणी ''हिंदुत्त्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा'' या पुस्तकातून अधोरेखित झाली आहे. मुजूमदार म्हणाले, ‘‘हिंदुत्त्ववाद्यांची ताकद विविध संघटनात आहे. या संघटनात्मक विणेचे आकलन होत नाही. त्याची मांडणी पुस्तकात केली आहे.’’ प्रा. सुभाष कोरे यांनीही आपले विचार मांडले.
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविकात चर्चासत्राचा हेतू स्पष्ट केला. प्रा. सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, कल्याणराव पुजारी, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. शिवाजी होडगे, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, रेखा पोतदार आदी उपस्थित होते. सुरेश दास यांनी सुत्रसंचलन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71550 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..