
‘माणकेश्वर’तर्फे मान्यवरांचा सत्कार
31835
माणगाव : एम. टी. कांबळे यांचा सत्कार करताना अनिल सुरुतकर व अन्य मान्यवर.
‘माणकेश्वर’तर्फे मान्यवरांचा सत्कार
चंदगड : माणगाव (ता. चंदगड) येथील माणकेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या, नवीन पदावर नियुक्त झालेल्या; तसेच निवृत्त झालेल्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम झाला. अनिल सुरुतकर अध्यक्षस्थानी होते. विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुधीर लांडे व उपाध्यक्ष सुनील पाटील यांचा सत्कार अनुक्रमे वाचनालयाचे उपाध्यक्ष जगदीश वाघराळे व तालुका संघाचे संचालक नामदेव बेनके यांच्या हस्ते झाला. धनलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झालेले अनिल पाटील यांचा सत्कार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयवंत सुरुतकर यांच्या हस्ते झाला. शिक्षण विस्तार अधिकारी पदावरून निवृत्त झालेले एम. टी. कांबळे यांचाही सत्कार झाला. त्यांनी वाचनालयाला ग्रंथ भेट दिले. अनिल पाटील, महादेव शिवणगेकर यांनी मनोगते व्यक्त केली. सटुप्पा फडके यांनी सूत्रसंचालन केले. मारुती चिंचणगी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71576 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..