शाहिरी जिवंत ठेवण्याचे कार्य अविस्मरणीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहिरी जिवंत ठेवण्याचे कार्य अविस्मरणीय
शाहिरी जिवंत ठेवण्याचे कार्य अविस्मरणीय

शाहिरी जिवंत ठेवण्याचे कार्य अविस्मरणीय

sakal_logo
By

31845
-----
शाहिरी जिवंत ठेवण्याचे कार्य अविस्मरणीय
श्रीनिवास पाटील; शाहीर विजय जगताप यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
इचलकरंजी, ता. २६ ः ‘‘शाहिरी कला जोपासत शूरवीर नररत्नांचे पोवाडे सादर करून शाहीर विजय जगताप यांनी नवक्रांतीच घडवली आहे. या कलेच्या माध्यमातून यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांत शाहिरी कला जिवंत ठेवण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे,’’ असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. येथील शाहीर विजय जगताप यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात गौरव समितीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पुंडलिक जाधव यांनी स्वागत केले. प्रताप होगाडे यांनी प्रास्ताविक केले.
खासदार पाटील यांच्याहस्ते ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्काराने शाहीर जगताप यांचा गौरव केला. कै. शाहीर राजाराम जगताप यांनाही या पुरस्काराने गौरवले. त्यांच्या पत्नी सावित्री जगताप यांनी पुरस्कार स्वीकारला. शाहीर विजय जगताप यांच्या ‘विजयश्री’ या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्री. पाटील यांच्याहस्ते आणि गौरव स्मरणिकेचे प्रकाशन रवींद्र ठाकूर यांच्याहस्ते केले. शाहीर जगताप यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपण नेहमी माणसे जोडण्याचे काम केल्याचे संगितले. आपला हा सत्कार म्हणजे निःस्वार्थपणे केलेल्या कामाची पोहोचपावती आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार राजीव आवळे, आदित्य पाटील-यड्रावकर, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी नगरसेवक रवींद्र माने, मदन कारंडे, शशांक बावचकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. आभार अहमद मुजावर यांनी मानले. सत्कार सोहळ्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील गीते व पोवाड्यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा स्फूर्तिदायक कार्यक्रम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71581 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top