छत्री, रेनकोट खरेदीला झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्री, रेनकोट खरेदीला झुंबड
छत्री, रेनकोट खरेदीला झुंबड

छत्री, रेनकोट खरेदीला झुंबड

sakal_logo
By

31861
गडहिंग्लज : आठवडा बाजारात छत्री खरेदी करताना महिला ग्राहक. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

छत्री, रेनकोट खरेदीला झुंबड
गडहिंग्लज बाजारभाव ः दोडका, ढब्बू तेजीत; वांग्याचे दर घसरले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे आज आठवडा बाजारात छत्री, रेनकोट, प्लास्टिक कागद खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली. मागणीमुळे दरही सरासरी २० टक्के वधारले आहेत. भाजीमंडईत वांग्याची आवक अधिक झाल्याने दर घससले आहेत. तुलनेत दोडका, ढब्बूचे दर तेजीत आहेत. फळबाजारात कर्नाटकातून अननसाची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची १०० हून अधिक आवक झाली.
तब्बल महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळेच पावसाळी साहित्य खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाल्याने आज आठवडा बाजारात छत्री, रेनकोट, प्लास्टिक कागद, बूट खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. सुमारे शंभरहून अधिक विक्रेते याची विक्री करीत होते. छत्रीचा दर १०० ते २५० रुपयांपर्यंत होता. रेनकोट २५० ते १५०० रुपयापर्यंत होते. साहित्य झाकण्यासाठी प्लास्टिक कागद खरेदी करणाऱ्यांची संख्याही अधिक दिसली. रबरी बूट, चप्पलचे १०० ते २५० रुपयापर्यंत दर होते.
भाजीमंडईत वांग्याची अधिकच आवक झाल्याने दर घसरले. परिणामी, मागणीअभावी सुमारे ४० टक्के वांग्याची विक्री झाली नसल्याचे भाजीपाला खरेदी-विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. घाऊक बाजारात किलोला केवळ २० रुपये, असा दर मिळाला. दोडका, ढब्बूला चांगला ४५ रुपये भाव मिळाला. हिरवी मिरची ३०, डॅाली शेंगा ६०, कारली २५, भेंडी २० रुपये असा घाऊक बाजारात दर होता. कोंथिबिराची आवक वाढू लागल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत निम्याने दर उतरला. शंभर पेंढ्याना ८०० रुपये दर मिळाला.
जनावरांच्या बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून आवक जेमतेम असल्याने उलाढाल थंडच आहे. आजही केवळ शेळ्या-मेंढ्यांची १०० हून अधिक आवक नोंदल्याचे बाजार समितीत सांगितले. ५ ते १० हजारांपर्यंत दर होते. म्हशींची ८० हून अधिक आवक होऊन २५ ते ७५ हजारांपर्यंत दर होते. फळबाजारात फणस ५० ते १५०, तोतापुरी १० रुपये नग असा भाव होता. सफरचंद १५०-२००, चिकू १००-१२५, पेरू १०० रुपये किलो दर होता.
-------------------
चौकट..
लिंबूचे दर उतरले
यंदा दराचा उच्चांक प्रस्थापित केलेल्या लिंबूचा दर पाऊस सुरू झाल्याने पूर्ववत झाला आहे. उन्हाळ्यात दहा रुपयापर्यंत एका लिंबूचा दर पोहोचला होता. आता शेकड्याचा दर पूर्वीप्रमाणे १०० ते २०० रुपयांवर आला आहे. किरकोळ बाजारात १ ते ३ रुपये असा नगाचा दर होता. स्थानिक आवक सुरू झाल्यानेच दर पूर्ववत झाल्याचे विक्रेते वसिष्ट पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71596 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..