
गडहिंग्लजमध्ये लोकराजाला अभिवादन!
31891
गडहिंग्लज : समता विचार मंचतर्फे बाजार समितीच्या आवारातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना डॉ. एम. एस. बेळगुद्री. सोबत समता विचार मंचचे पदाधिकारी.
लोकराजाला अभिवादन!
जयंतीनिमित्त शाहूंच्या कार्याला उजाळा; शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम झाले. शाहू महाराजांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारातील शाहूंच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
गडहिंग्लज नगरपरिषद
येथील नगरपरिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी धनंजय चव्हाण, ओंकार बजागे, रविनंदन जाधव, निखिल पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
समता विचार मंच
समता विचार मंचसह विविध पक्ष-संघटनातर्फे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. बाजार समितीच्या आवारातील शाहूंच्या अर्धपुतळ्याला डॉ. एम. एस. बेळगुद्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सताप्पा कांबळे, युवराज बरगे, प्रकाश कांबळे, कल्पना कांबळे, शंकर कांबळे, अरविंद बारदेस्कर, रफिक पटेल, प्रा. प्रकाश भोईटे, अशोक मोहिते, महादेव बारामती, प्रा. शिवाजी होडगे आदी उपस्थित होते.
चैतन्य अपंगमती विकास विद्यालय
चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात (निवासी) छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. वीज कंपनीचे निवृत्त कार्यकारी अभियंता शंकर कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. मुख्याध्यापिका अरुणा कांबळे, साताप्पा कांबळे, संभाजी पोवार, सागर कांबळे, मारुती कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी
भारतीय जनता पार्टीतर्फे राजर्षी शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. बाजार समितीच्या आवारातील शाहूंच्या पुतळ्याचे पुजन केले. विठ्ठल भमान्नगोळ यांच्या हस्ते पु्ष्पहार अर्पण करण्यात आला. पक्षाचे प्रसारक संदीप नाथबुवा, वाय. बी. कुलकर्णी, संतोष पेडणेकर, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
क्रिएटीव्ह हायस्कूल
क्रिएटीव्ह हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी प्रास्ताविक केले. व्ही. आय. कुटिन्हो यांनी शाहू महाराजांच्या व्यक्तीमत्वातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ए. व्ही. शिवबुगडे यांनी सूत्रसंचालन केले. सै. एन. एम. पाटील यांनी आभार मानले.
गडहिंग्लज हायस्कूल
गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एम. एस. शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. एस. पी. पाटील यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. प्राचार्य पी. टी. पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. डी. बी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सी. एस. देसाई यांनी आभार मानले.
ओंकार महाविद्यालय
ओंकार महाविद्यालयात शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी शाहूंच्या कार्याची माहिती दिली. शाहू महाराजांनी २८ वर्षांच्या कारकिर्दीत केलेले कार्य खुपच मौल्यवान असल्याचे सांगितले. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.
कोलेकर महाविद्यालय
नेसरी : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर अध्यक्षस्थानी होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विजय मुसाई यांनी स्वागत केले. प्राचार्य भांबर यांच्या हस्ते शाहूमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. विकास क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात शाहू महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती विशद केली. शाहू महाराजांच्या जीवन पटावर आधारित भिंती पत्रिकेचे प्रकाशन डॉ. भांबर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. डी. एम. पाटील, डॉ. एच. एस. कुचेकर, प्रा. एस. बी. चौगुले, डॉ. डी. के. कांबळे, प्रा. वसंत कांबळे, दिनकर पाटील, विठ्ठल आजगेकर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71624 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..