आजऱ्यात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन
आजऱ्यात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

आजऱ्यात राजर्षि शाहू महाराजांना अभिवादन

sakal_logo
By

31943
मडिलगे (ता. आजरा) ः येथे वृक्षारोपण करताना सरपंच जी. एम. अरळगुंडकर, चेतन घाटगे, दीपक देसाई, अनिकेत कवळेकर व मान्यवर.

आजऱ्यात अभिवादन
आजरा : आजरा तालुक्यात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी झाली. शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायती व विविध संस्थांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. आजरा शहरात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहू जयंती साजरी झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, कार्याध्यक्ष संभाजी इंजल व पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष शंकरराव शिंदे यांनी शाहूंच्या जीवनकार्याची माहिती दिली. या वेळी उद्योजक महादेव पोवार, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, शिवाजी इंजल, शिवाजीराव गुडूळकर, विष्णू सुपल, गीता नाईक, सरस्वती पोवार उपस्थित होते. प्रकाश देसाई यांनी आभार मानले. मडिलगे (ता. आजरा) येथील मडिलगे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आय. डी. फर्नांडिस यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आर. व्ही. सावंत यांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. विभावरी मुंज हिने शाहूंच्या जीवनातील प्रसंगी सांगितले. ए. व्ही. बापट, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ए. सी. फगरे यांनी सूत्रसंचालन केले. ए. टी. मोहिते यांनी आभार मानले. देवर्डे येथील विद्यामंदिर देवर्डे व रवळनाथ हायस्कूलमधील कार्यक्रमात सुनील सुतार अध्यक्षस्थानी होते. चंद्रकांत घुरे, राजीव गुरव यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. राजेंद्र पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. चंद्रकांत घुणे यांनी आभार मानले. व्यंकटराव हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते झाले. शिंपी म्हणाले, ‘‘छत्रपती शाहू महाराजांचे कार्य लोकोत्तर होते. त्यांनी जीवनात कायम वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला. न्यायाची चाड व सर्वसामान्याविषयी जिव्हाळा बाळगणारे राजर्षी शाहू महाराज हे द्रष्ट्ये नेते होते.’’ उपाध्यक्ष अण्णासो पाटील, सचिव एस. पी. कांबळे, संचालक सुनील देसाई, पर्यवेक्षक एस. एन. पाटील, कृष्णा दावणे उपस्थित होते. प्राचार्य एस. जी. खोराटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पी. व्ही. पाटील यांनी आभार मानले. आजरा पोलिस ठाण्यातर्फे पेरणोलीसह १४ गावांत वृक्षारोपण मोहीम झाली. आजरा पोलिस ठाण्याचे पेरणोली बीटचे अमलदार चेतन घाटगे यांनी हा उपक्रम राबविला. मडिलगेचे सरपंच जी. एम. अरळगुंडकर, माजी उपसभापती दीपक देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिकेत कवळेकर, ग्रामसेवक पाटील, विशाल कांबळे, हरपवडेच्या सरपंच वैशाली गुरव, सुरेश पाटील (कोरीवडे), श्रीमती संकपाळ, देवकांडगावचे सरपंच सुनील देसाई, धीरज राणे पदाधिकारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. आजऱ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
----------------
चौकट
पेरणोलीसह १३ गावांत वृक्षारोपण
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजरा पोलिस ठाण्याचे पेरणोली बीट अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पेरणोली बीटचे अमलदार चेतन घाटगे यांनी वृक्षारोपणासाठी झाडे दिली होती. पेरणोली, मडिलगे, खेडे, सोहाळे, बाची, नावकरवाडी, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडी, साळगाव, सुलगाव, चांदेवाडी या गावात वृक्षारोपण झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71699 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..