
निमशहरी विभागात घाळी कॉलेज प्रथम
निमशहरी विभागात
घाळी कॉलेज प्रथम
गडहिंग्लज, ता. २७ : शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात निमशहरी विभागात येथील डॉ. घाळी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. सलग सात वर्षे विद्यापीठाच्या गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या क्रमवारीत महाविद्यालयाने प्रथम क्रामंक मिळवित आहे.
सीमा भागातील एक महत्त्वाचे गुणवत्ता महाविद्यालय म्हणून ओळख निर्माण केलेले घाळी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असते, अशी माहिती प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी दिली. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणात्मक विकासाबद्दल संस्थाध्यक्षा रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सर्व संचालकांनी गौरवोद्गार काढले. प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना हे यश मिळाल्याचे डॉ. घाळी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वारंवार सिद्ध केली आहे. महाविद्यालयाचा लौकिक वाढविणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालकांचे यासाठी मोलाचे सहकार्य मिळाल्याचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71749 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..