आमदार माराहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार माराहाण
आमदार माराहाण

आमदार माराहाण

sakal_logo
By

आमदार आबिटकरांचा
इतरांशी वाद झाल्याची अफवा
................
आबिटकरांचा इन्कार ः ट्विट करून केला खुलासा
...............
कोल्हापूर, ता. २६ ः सध्या गुवाहाटीत असलेले जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा त्या ठिकाणी असलेल्या काही आमदारांसोबत वाद झाल्याची अफवा आज सोशल मीडियावर व्हायरल झाली. तथापि असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती श्री. आबिटकर यांनी दिली, तसे ट्विट करून त्यांनी खुलासाही केला. शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच बंड पुकारले आहे. गेल्या सोमवारी त्यांनी सुरुवातीला २० आमदारांसह सुरत गाठली व तेथून ते गुवाहाटीला गेले आहेत. आतापर्यंत त्यांना सेनेचे ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा देत त्यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. यात पहिल्या दिवसांपासून सेनेचे आमदार श्री. आबिटकर त्यांच्यासोबत आहेत. चार दिवसांपासून सर्व बंडखोर आमदारांचा मुक्काम गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसनमध्ये आहे. सुरुवातीला आबिटकर अस्वस्थ होते, त्यांनी पळून येण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप यापूर्वी परत आलेले आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. आज पुन्हा काही आमदार व श्री. आबिटकर यांच्यात वाद झाल्याची अफवा पसरली. एका न्यूज चॅनेलने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली; पण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा खुलासा श्री. आबिटकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे केला आहे.
...........

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71779 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..