वक्तृत्व स्पर्धेत हेमा दोडके प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धेत हेमा दोडके प्रथम
वक्तृत्व स्पर्धेत हेमा दोडके प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत हेमा दोडके प्रथम

sakal_logo
By

32024
गडहिंग्लज : कित्तूरकर महाविद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या हेमा दोडके हिला पारितोषिक देताना विजय चौगुले. शेजारी प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुनील देसाई, प्रा. अनिता चौगुले, प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा. सुभाष कोरे.


हेमा दोडके वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा झाली. १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्राचार्य विजय चौगुले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. प्रा. सुभाष कोरे यांनी स्वागत केले. प्रा. विजय काळे यांनी स्पर्धेचे नियम व सूचना सांगितल्या. या स्पर्धेत हेमा दोडके, सुमित्रा मगदूम, दीक्षा शेरेकर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले; तर प्रतीक्षा सावंत, अमृता सासुलकर, सपना कुंभार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा. शिवाजी पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. उपप्राचार्या अनिता चौगुले, प्रा. सुनील देसाई, प्रा. दिनेश चिकुर्डे, प्रा. शिवानी पेडणेकर, प्रा. वीणा कापसे, प्रा. तृप्ती हंजी, प्रा. अनिता माळगी, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुरेश घस्ती, प्रा. अनिता कांबळे, प्रा. अश्विनी पाटील, प्रा. सतीश गणाचार्य आदी उपस्थित होते. प्रा. पी. बी. रक्ताडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71847 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..