गड-मराठी विज्ञान परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-मराठी विज्ञान परिषद
गड-मराठी विज्ञान परिषद

गड-मराठी विज्ञान परिषद

sakal_logo
By

01653
राधानगरी पंचायत समिती कर्मचारी
सहकारी पतसंस्थेचा १४ टक्के लाभांश
कसबा तारळे : राधानगरी पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी १४ टक्के लाभांश निश्चित केला असून संस्थेला आर्थिक वर्षात २८ लाख १८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष विजय मोरे यांनी दिली. पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष बाबूराव शिरसाट, सुकाणू समितीचे पदाधिकारी विलासराव पाटील व नामदेव पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री. मोरे यांनी अहवालवाचन करताना सांपत्तिक स्थितीचे विवेचन केले. दीपप्रज्वलन संस्थापक शिरसाट, विलासराव पाटील, अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष साताप्पा पाटील, संचालक आर. एस. पाटील आदींच्या हस्ते झाले. निवृत्त सभासदांचा तसेच विविध ठिकाणी निवड झालेल्या सभासदांचा सत्कार झाला. संस्थापक शिरसाट, संचालक आर. एस. पाटील, पांडुरंग बर्गे, डी. पी. पाटील, धनाजी महेकर आदींची भाषणे झाली. संचालक कुलदीप पाटील, बळवंत पोवार, विलास निचिते, बळवंत चौगले, पांडुरंग कुंभार, संभाजी खोत, मंगल पाटील, प्रभावती जाधव आदींसह सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक संतोष शिऊडकर यांनी स्वागत केले व आभार मानले.

‘मविप’तर्फे शुक्रवारी कार्यशाळा
गडहिंग्लज : मराठी विज्ञान परिषदेची येथील शाखा व मुंबईतील होमी भाभा शिक्षण केंद्रातर्फे शुक्रवारी (ता.१) कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शालेय विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. विज्ञानाबद्दल आवड, संशोधनवृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. डॉ. संध्या ठाकूर (मुंबई), डॉ. स्नेहा गोगटे, डॉ. विश्वनाथ गोगटे (हैदराबाद), डॉ. निवेदिता देशमुख (मुंबई), डॉ. नरेंद्र देशमुख (मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत गडहिंग्लज सायन्स सेंटर येथे ही कार्यशाळा होईल. इच्छूकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. एस. के. नेर्ले यांनी केले आहे.

02561

कळेतील रूद्रभूमीत वृक्षारोपण
कळे : येथील वीरशैव युवक संघटनेने वीरशैव रुद्रभूमीत शंभरहून अधिक देशी रोपांचे वृक्षारोपण करून शाहू महाराजांना अभिवादन केले. वनरक्षक बाजीराव देसाई, पूजा नरुटे, वनसेवक निवृत्ती चौधरी, राजन भंडारी, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय; शाखेच्या ब्रहमाकुमारी राणी बहेनजी, संगीता बहेनजी, अश्विनी बहेनजी, गीता बहेनजी, सीमा बहेनजी, ग्रामपंचायत सदस्या संध्या रघुनाथ देसाई, अश्विनी सागर मोळे, सुरेखा सोनदेव बेलेकर, जितेंद्र देसाई, सरपंच सुभाष पाटील, उपसरपंच शांताबाई झुरे, स्वप्नील पोवार, चंद्रकांत नरुटे, निळकंठ झुरे, दत्तात्रय डांगे, अनिल व्हंडराव यांची उपस्थिती होती. उमेश डबीरे, स्वप्नील सादुले, शांतिनाथ पाटणे, सोनल झुरे, सुनील डबीरे, अमर मिठारी, आनंदा झिरकांडे, सिद्धेश मिठारी, सुनील मेंडगुले, अनिल भुसके, सचिन हिंगे, रोहित मिठारी, रोहित नकाते, प्रसाद मिठारी यांनी परिश्रम घेतले.

०३०००
भोगावती महाविद्यालयात कार्यक्रम
शाहूनगर : भोगावती महाविद्यालय कुरुकली मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षिक संघतर्फे ‘नव्वदोत्तरी मराठी साहित्यातील विविध प्रवाह’ या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. अध्यक्षस्थानी सर्जेराव पाटील होते. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, प्रो. डॉ. प्रकाश दुकळे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे, माजी प्राचार्य आर. ए. सरनोबत, प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, संपादक मंडळ प्रो. डॉ. सविता व्हटकर, प्रा. नमिता पाटील, प्रा. विश्वास पाटील, प्रा. सविता टिपुगडे, प्रा. रणजित हसूरकर सर्व संचालक मंडळ पदाधिकारी प्राध्यापक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72004 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..