जिल्हा बार असोसिएशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बार असोसिएशन
जिल्हा बार असोसिएशन

जिल्हा बार असोसिएशन

sakal_logo
By

३२२१५

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
एस. सी. चांडक यांचा सत्कार
जिल्हा बार असोसिएशनतर्फे नूतन न्यायाधीशांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः नूतन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. चांडक यांचा जिल्हा बार असोसिएशनर्फे सत्कार करण्यात आल्या. न्याय संकुलातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नूतन न्यायाधीश सर्वश्री एस. पी. गोंधळेकर, ए. बी. धुळधुळे, एस. ए. बाफना, एस. ए. गुप्ता, एस. डी. शिरसाट, ए. एस. व्यास यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी बार आणि बेंचमध्ये समन्वय साधून जलद न्यायदानाचे काम करू असे सांगितले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. सी. चांडक यांनी पक्षकाराचे जुने प्रलंबित असलेले दावे लवकरात लवकर चालवून जलद न्यायदानाचे काम करूया. सध्या जिल्हा न्यायालयात असलेली न्यायाधीशांची टीम सक्षम आहे. करवीर नगरीत काम करण्यास मिळणे हे आम्ही भाग्य मानतो असे सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश (क्रमांक १) श्रीमती. पी. एफ. सय्यद, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, ॲड. तृप्ती नलवडे, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. सुशांत चेंडके, ॲड. संदीप मालेकर, ॲड. के. ए. कापसे, ॲड. पी. आर. पाटील, ॲड. राजेंद्र किंकर, ॲड. नारायण बांदिगरे आदींसह न्यायधीशवर्ग व वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह-सचिव ॲड. संदीप चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72034 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..