बांधकाम कामगार नोंदणी लुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगार नोंदणी लुट
बांधकाम कामगार नोंदणी लुट

बांधकाम कामगार नोंदणी लुट

sakal_logo
By

बांधकाम कामगारांची आर्थिक लूट
एजंट, मध्यस्थांची टोळी; नोंदणीसाठी मागितली जाते अव्वाच्या सव्वा रक्कम

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २७ ः बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांमार्फत लाभ देण्यात येतात. लाभांचे आमिष दाखवीत काही एजंट नोंदणीसाठी कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. रकमेची मागणी पूर्ण न करू शकल्याने अधिकृत बांधकाम कामगार मंडळाकडून मिळणाऱ्या लाभापासून कामगार वंचित राहत आहेत. एजंट, मध्यस्थाकडून होणाऱ्या लूटीस आळा घालण्यासाठी कार्यालयानेही परिपत्रक काढून आमिषाला बळी पडू नका असे आवाहन केले होते. मात्र कामगारांच्या अशिक्षितेचा फायदा घेत अद्यापही एजंटांचे काम खुलेआम सुरू आहे.
बांधकाम कामगारांना मंडळातर्फे शैक्षणिक सहाय्य, आरोग्य सामाजिक सुरक्षा व अन्य व आर्थिक सहाय्य केले जाते. मंडळाचे कामकाज सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत चालवण्यात येते; परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे, नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी शुल्क रुपये ३७ (वर्षासाठी) व नुतनीकरण शुल्क रुपये १२ (वर्षासाठी) आकारले जाते. त्यासोबत शासनाच्यावतीने सुरक्षा संच व अत्यावश्यक संच मोफत वाटप केले जातात. या लाभाचे आमिष दाखवून एजंट, मध्यस्थ सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत. वर्षाकाठी १० हजाराच्या आसपास होणाऱ्या नोंदी २०२१-२२ मध्ये २२ हजार ५५४ नोंदी झाल्या आहेत.
इचलकरंजी सहायक बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. सध्या ५२ हजार ८४१ कामगारांची नोंद आहे. यामधील जीवित नोंदी ३७ हजार ५३४ आहेत. यामध्ये बांधकाम कामगारांसोबत, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकुलीन यंत्र दुरुस्ती, यासह २१ प्रकारच्या कामगारांचा समावेश असून त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. बांधकाम कामगार नोंदणीसाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, जन्माचा दाखला, स्वयंघोषणा पत्र, आधारसमतीपत्र, ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र व बँक पासबुकची प्रत यासह नोंदणी फी ५० रुपये आवश्यक असते. वर्गणी दरमहा १ रुपयांप्रमाणे भरावी लागते.
----
दृष्टिक्षेपात नोंदणी

वर्ष नोंदीत बांधकाम कामगार
*१/४/२०१९ ते १/४/२०२०* *१०५९८*
*१/४/२०२० ते ३१/३/२०२१* *१६२०*
*१/४/२०२१ ते ३१/३/२०२२* *२२५५४ *
*एकूण* *३४७६९*

----------------
काही खाजगी उमेदवारांकडून नोंदणी व नूतनीकरणासाठी अधिक रकमेची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. बांधकाम कामगारांनी कार्यालयाकडुन नोंदणी व नुतनीकरण ऑनलाईन पद्धतीने करुन घ्यावे. तसेच एजंटाकडून दाखविण्यात येणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये. कामगारांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.
- अनिल गुरव, सहायक बांधकाम आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72055 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..