जिल्हा बॅंकेत झाली बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेत झाली बैठक
जिल्हा बॅंकेत झाली बैठक

जिल्हा बॅंकेत झाली बैठक

sakal_logo
By

सकाळ इम्फक्ट लोगो
कात्रण -32242
त्रुटी दूर करून प्रोत्साहनात्मक
अनुदानाचा लाभ देणार
--
हसन मुश्रीफ : जिल्हा बॅंकेच्या बैठकीत प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पाठपुराव्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : राज्य शासनाने प्रामाणिक व वेळेत अल्पमुदतीतील कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात्मक ५० हजार रुपये अनुदान वाटपाच्या नियम व अटींत त्रुटी आहे, त्या शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. तर,ज्या वर्षी कर्ज घेतले, त्याच्या दुसऱ्या वर्षी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार राज्य शासनाकडे मागणी करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेत आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. या वेळी, आमदार पी. एन. पाटील, जिल्हा बॅंकेच उपाध्यक्ष आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनात्मक निधी वाटपाच्या नियमात काही त्रुटी आहेत. त्या तत्काळ दूर केल्या जातील. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. चर्चेतून पूरग्रस्तात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत किंवा इतर अटी शिथिल करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. दरम्यान, जिल्हा बॅंकेत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. हा प्रश्‍न कोल्हापूर जिल्हा बॅंकेचा नाही. तरीही बॅंकेच्या सर्व संचालक आणि जिल्ह्यातील आमदारांकडून राज्य शासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, एखाद्याने पूर्वी शासकीय अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्याला दुसरा लाभ घेता येत नाही. असा नियम ३० वर्षांपूर्वीपासून राबवला जात आहे. मात्र आपत्ती दरम्यान घेतलेला निर्णयात बदल करता येतो, का यावर चर्चा केली जाणार आहे.
.....
त्याचवर्षी परतफेड
अट शिथिलची मागणी
उसासाठी ज्या वर्षी कर्ज घेतले, त्याच वर्षी त्याची परतफेड होत नाही. ऊस हे चौदा ते सोळा महिन्याचे पीक आहे. त्यामुळे या वर्षी कर्ज घेतले तर पुढील वर्षी त्याची परतफेड होते.ज्या वर्षी कर्ज घेतले, त्याचवर्षी त्याची परतफेड झाली असावी ही कर्जाची अट शिथिल करावी, अशी जिल्हा बॅंकेच्या सर्व संचालक व आमदारांनी मागणी केली आहे.
....

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72077 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..