घरफाळा सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा सवलत
घरफाळा सवलत

घरफाळा सवलत

sakal_logo
By

कर सवलत योजनेतून
१७ कोटींवर घरफाळा जमा

६ टक्के सवलत योजनेचे शेवटचे ३ दिवस

कोल्हापूर, ता. २७ : घरफाळा सवलत योजनेतून सोमवारअखेर ३५ हजार करदात्यांनी १७ कोटी सात लाख ६३ हजार कर भरला. सोमवारी एका दिवसात ७० लाख ५१ हजार रुपयांचा भरणा झाला. गुरुवारपर्यंत (३० जून) ६ टक्के सवलत दिली जाते. मंगळवारपासून ३० जूनपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार आहेत. कर एकरकमी भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना ३० जूनअखेर ६ टक्के सवलत दिली जाते. या योजनेचे तीन दिवस असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सोमवारअखेर ३५,०३८ करदात्यांनी १७ कोटी ७ लाख ६३ हजार ९३० इतका कर भरणा केला. सोमवारी एका दिवसात ७० लाख ५१ हजार २१५ रुपये जमा झाले. १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर करदात्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे. तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर २ टक्के सवलत दिली जाणार आहे. ६ टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त करदात्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

32236
कचरा, गाळ, फांद्या
उठावसाठी १८ ट्रॅक्टर-ट्रॉली
कोल्हापूर : शहराअंतर्गत स्वच्छता केल्यानंतर निर्माण होणारा कचरा, गाळ, फांद्या तसेच भाजीपाला मार्केटमधील कचरा उठाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १८ ट्रॅक्टर ट्रॉली भाडे तत्त्‍वावर घेतल्या आहेत. यासाठी नागरिकांनी वॉर रूमशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे शहरातील संपूर्ण कचरा, गाळ, फांद्या तसेच भाजीपाला मार्केटमधील कचरा उठाव करण्यासाठी वॉर रुमशी (०२३१-२५४२६०१, २५४५४७३, ९७६६५३२०३७) संपर्क साधावा. त्या ठिकाणी ट्रॉली जाऊन कचरा उठाव करेल. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फांद्या टाकल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करेल. नागरिकांनी आरोग्य विभाग अथवा वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

32235
डेंगी, चिकनगुण्‍या सर्वेक्षणात
१७ कंटेनर आढळले दूषित
कोल्हापूर : शहरात डेंगी, चिकनगुण्‍याच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून दररोज औषध फवारणी, धूर फवारणी व डास अळी कंटेनर सर्वेक्षण केले जात आहे. ४८२ कंटेनरची तपासणीमध्ये १७ कंटेनर दूषित आढळले. रिकामे करता न येणाऱ्या २ कंटेनरमध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले. ६ कंटेनर रिकामे केले आहेत. हे सर्वेक्षण शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी सातवी गल्ली, कणेरकर नगर व न्यू पॅलेस परिसर या ठिकाणी करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72082 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top