संजय गांधी योजनेचे पैसे जमा करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय गांधी योजनेचे पैसे जमा करण्याची मागणी
संजय गांधी योजनेचे पैसे जमा करण्याची मागणी

संजय गांधी योजनेचे पैसे जमा करण्याची मागणी

sakal_logo
By

32265
आजरा : तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देताना मुकुंद नार्वेकर. या वेळी अल्बर्ट डिसोजा व अन्य.

संजय गांधी योजनेचे पैसे
जमा करण्याची मागणी
आजरा, ता. २९ : विधवा परित्यक्ता, निराधार स्त्री पुरुषांना दिली जाणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन तत्काळ खात्यावर जमा करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संपत देसाईंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला आहे. याबाबत तहसीलदार विकास अहिर यांना अपंग पुनर्वसन समितीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले.
राज्यात विधवा सन्मानाचे वारे वाहत आहेत. विधवांसह परित्यक्ता, अपंग आणि निराधार स्त्री पुरुषांची मिळणारी पेन्शन तटवून प्रशासनाने शासनाच्या परिपत्रकला एक प्रकारे हरताळ फासला आहे. अपंग, विधवा, परित्यक्ता निराधार स्त्री पुरुषांना दिली जाणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन तत्काळ खात्यावर जमा करा. पेन्शन खात्यावर जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. या वेळी संजय गांधी समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा, मुकुंद नार्वेकर, निवृत्ती फगरे, संतोष सुतार, दिलीप कांबळे, सुशीला होरंबळे यांच्यासह अपंग पुनर्वसन संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72084 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top