अनिलपंत कोरगावकर निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिलपंत कोरगावकर निधन
अनिलपंत कोरगावकर निधन

अनिलपंत कोरगावकर निधन

sakal_logo
By

३२२४३
दलितमित्र, ज्येष्ठ उद्योजक
अनिलपंत कोरगावकर यांचे निधन
कोल्हापूर, ता. २७ : येथील ज्येष्ठ उद्योजक, दलितमित्र गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेचे विश्वस्त दलितमित्र अनिलपंत प्रभाकरपंत कोरगावकर (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुचेता, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. गारगोटी येथील मौनी विद्यापीठ संस्थेचे अध्यक्ष आशिष कोरगावकर यांचे ते वडील होत.
श्री. कोरगावकर यांनी कोरगावकर ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरवले. त्यांनी निपाणी, गडहिंग्लज परिसरातील देवदासी निर्मूलनासाठी सढळ हाताने मदत करून ही प्रथा बंद पाडली. पूरग्रस्तांना मदतीबरोबरच झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. राजर्षी शाहू ब्लड बॅंक, वाचा बधिर केंद्र या संस्थांना त्यांनी आपली जमीन देऊन मदत केली. सदर बाजार परिसरात कोरगावकर हायस्कूलच्या माध्यमातून सामान्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
गुरुवारी आदरांजली सभा
श्री. कोरगावकर यांना आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी (ता. ३०) आदरांजली सभेचे आयोजन केले आहे. शाहूपुरीतील वसंतराव चौगुले पतसंस्थेत सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या सभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आंतरभारती शिक्षण मंडळाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72098 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..