बंदोबस्तात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदोबस्तात वाढ
बंदोबस्तात वाढ

बंदोबस्तात वाढ

sakal_logo
By

बंडखोर आमदारांच्या
घराभोवती खडा पहारा
यड्रावकर, आबिटकरांसह क्षीरसागरांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानावरील पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनाला प्रतिआंदोलन, निषेधाला प्रतिनिधेष करणे सुरू आहे. दक्षतेचा भाग म्हणून मुंबईतील संबधित मंत्री आणि आमदार यांना केंद्राची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस दलाने राज्यमंत्री यड्रावकर, आमदार आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष क्षीरसागर यांच्या निवासस्थासह कार्यालयाच्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, आज जयसिंगपूर येथे शिवसैनिक आणि यड्रावकर समर्थक आमने सामने आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थिती पोलिसांनी वेळीच नियंत्रणात आणली. दक्षतेचा भाग म्हणून यड्रावकर, आबिटकर आणि क्षीरसागर यांना पुरविण्यात आलेल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहान पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72125 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..