सारथी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारथी बातमी
सारथी बातमी

सारथी बातमी

sakal_logo
By

32261

कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर द्यावा
.....
जिल्हाधिकारी राहुल रेखावार ः सारथी कौशल्य विकास जनजागृती मेळावा
...........
कोल्हापूर, ता. २७ ः सारथीच्या अल्प काळातील कामांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाच्या योजना तसेच सारथी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांत सहभाग घेऊन नवउद्योजकांनी कौशल्यपूर्ण व्यवसायावर भर देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) उपकेंद्र कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे कौशल्य विकास जनजागृती मेळावा झाला.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी लोकराजा शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव करत युवकांनी कौशल्यावर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी नोकरीच्या आशेने वेळ न दवडता उद्योग, प्रशिक्षण, मेहनतीवर भर द्यावा. जिल्हा प्रशासन नवउद्योजकांना शासकीय योजनेतून सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शिक्षण आणि उद्योगांवर भर देत वेळ व कौशल्यपूर्ण प्रशिक्षणासाठी युवकांनी स्वत:मध्ये बदल करावेत. व्यवसाय करताना कमीपणा न बाळगता प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.
सारथीचे निबंधक तथा अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, कार्यकारी अभियंता संजय पाटील, आण्णासाहेब गुरव, डॉ. राऊत, श्री. जाधव, कौशल्य विकास यंत्रणाचे सहायक आयुक्त संजय माळी आदी उपस्थित होते.
सारथी कार्यालयामार्फत मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी या समाजातील लाभार्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येत असतात. याच पार्श्वभूमीवर संबंधित समाजातील उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देणे प्रस्तावित असून अशा १८ ते ४५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांना याचा लाभ व्हावा यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यादरम्यान लाभार्थींसहित उपस्थितांना उपलब्ध कौशल्य विकासाद्वारे विविध संधींबाबत माहिती दिली.
शाहीर डॉ. आझाद नायकवडी व सहकार्यांनी पोवाडा सादर करून शाहू महाराजांच्या कार्यास अभिवादन केले. निशा साळुंखे यांनी निवेदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72127 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top