जलसंपदा विभाग बैठक भूषण गगराणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसंपदा विभाग बैठक भूषण गगराणी
जलसंपदा विभाग बैठक भूषण गगराणी

जलसंपदा विभाग बैठक भूषण गगराणी

sakal_logo
By

32267
पूरस्थितीत धरणांतील साठ्याचे नियोजन करा
सचिव भूषण गगराणी; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः पूरस्थितीत धरणांतील पाण्याचे नियोजन योग्य करण्याच्या सूचना ‘नगरविकास’चे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गतवर्षीच्या नियोजनाबद्दल कौतुकही केले.
सचिव गगराणी आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी प्रशासकीय बैठकात घेतल्या. यात जलसंपदा विभागातही बैठक झाली. बैठकीत त्यांनी पूरस्थितीतील धरणांच्या पाण्याची स्थिती काय असेल, सध्या काय आहे, याची माहिती घेतली. गतवर्षी आणि यावर्षीची तुलना करून पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र किती आहे, चिकोत्रातील पाणी वाटप याचीही माहिती घेतली. गतवर्षी धरणातील विसर्गाची माहिती घेऊन पूरस्थिती निर्माण झाली, तरीही धरणातील पाण्याचे नियोजन कसे असले पाहिजे, याबाबत सूचना केल्या.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात यावर्षी नव्याने निळी आणि लाल पूररेषा निश्‍चित केली आहे. त्याची सध्याची नेमकी काय स्थिती आहे, डी. पी. रस्त्यांचे नियोजन कसे केले आहे, याचीही माहिती घेतली.
अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, संजय पाटील, डी. डी. शिंदे, स्मिता माने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72134 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..