
गड-मराठी विज्ञान परिषद
01653
राधानगरी पंचायत समिती कर्मचारी
सहकारी पतसंस्थेचा १४ टक्के लाभांश
कसबा तारळे : राधानगरी पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांसाठी १४ टक्के लाभांश निश्चित केला असून संस्थेला आर्थिक वर्षात २८ लाख १८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष विजय मोरे यांनी दिली. पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष बाबूराव शिरसाट, सुकाणू समितीचे पदाधिकारी विलासराव पाटील व नामदेव पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री. मोरे यांनी अहवालवाचन करताना सांपत्तिक स्थितीचे विवेचन केले. दीपप्रज्वलन संस्थापक शिरसाट, विलासराव पाटील, अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष साताप्पा पाटील, संचालक आर. एस. पाटील आदींच्या हस्ते झाले. निवृत्त सभासदांचा तसेच विविध ठिकाणी निवड झालेल्या सभासदांचा सत्कार झाला. संस्थापक शिरसाट, संचालक आर. एस. पाटील, पांडुरंग बर्गे, डी. पी. पाटील, धनाजी महेकर आदींची भाषणे झाली. संचालक कुलदीप पाटील, बळवंत पोवार, विलास निचिते, बळवंत चौगले, पांडुरंग कुंभार, संभाजी खोत, मंगल पाटील, प्रभावती जाधव आदींसह सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक संतोष शिऊडकर यांनी स्वागत केले व आभार मानले.
३४१०
तमदलगे तंटामुक्तचे खोंद्रे अध्यक्ष
जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर बापू खोंद्रे यांची एकमताने निवड केली. गावातील सर्व तंटे सामोपचाराने मिटवून त्यांनी पाच लाखांचा पुरस्कार मिळवून दिला होता. या कार्याची दखल घेत त्यांची या पदावर निवड केली. निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीसाठी सरपंच धनाजी नंदीवाले, ग्रामसेवक श्री गायकवाड, उपसरपंच सौ पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने गावातील हेवेदावे गावातच सामोपचाराने मिटवून गावात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही श्री खोंद्रे यांनी दिली.
२६९३, २६९४
केदारलिंगच्या अध्यक्षपदी धोंडिराम ढेरे
शाहूनगर ः परिते (ता. करवीर) येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी धोंडीराम दादू ढेरे यांची तर उपाध्यक्षपदी गजानन विष्णू पाटील यांची एकमताने निवड झाली. निवडणुकीत भोगावती कारखान्याचे संचालक डी. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीने १३ पैकी ८ जागा जिंकून बहुमत मिळवले. संचालक असेःः अजित आत्माराम पाटील, जगन्नाथ बाबूराव पाटील, सुनील आनंदराव कारंडे, अजित पांडुरंग पाटील, जनार्दन गुंडू पाटील, साताप्पा कुंडलिक पाटील, मीनाक्षी प्रकाश जाधव, गीतांजली अरविंद कारंडे, महिपती विठू सुतार, धनाजी लक्ष्मण भोपळे, श्रीकांत नारायण सनगर.
00371
म. ह. शिंदे महाविद्यालयात रोजगार मेळावा
असळज : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म. ह. शिंदे महाविद्यालयात विविध कंपन्यांचा रोजगार मेळावा झाला. मेळाव्यास प्रमुख पाहुणे ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडेचे सचिव स्वप्नील शिंदे तर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.बी. एस. पडवळ उपस्थित होते. एल.पी.एल आणि म. ह. शिंदे महाविद्यालयात सामंजस्य करार झाला. एल.पी.एल अकॅडमी, लँप पँथ फाउंडेशनने रोजगाराच्या संधीची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी महूद उस्मान, प्रमुख अमितकुमार कांबळे, कृष्णात पाटील, धनलोभे यांनी दिली. मुलाखतीमधून २० मुलांची निवड केली. डॉ. आर. पी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. बी. डी. पाटील आभार यांनी मानले. प्रा. ए. डी. पिंजरकर यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72169 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..