सॉकर ट्रेनिंग सेंटरचे तिघे मध्यप्रदेशच्या संघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सॉकर ट्रेनिंग सेंटरचे तिघे मध्यप्रदेशच्या संघात
सॉकर ट्रेनिंग सेंटरचे तिघे मध्यप्रदेशच्या संघात

सॉकर ट्रेनिंग सेंटरचे तिघे मध्यप्रदेशच्या संघात

sakal_logo
By

32281
अब्दुल कोचरगी, वैभव कोंडेकर, यशवंत संकपाळ

सॉकर ट्रेनिंग सेंटरचे तिघे
मध्य प्रदेशच्या संघात
गडहिंग्लज, ता. २८ : येथील सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या तीन खेळाडूंची यूथ लीग व एमपी फुटबॉल लीगसाठी निवड झाली. मध्य प्रदेश येथील कासा बडवाणी एफसी या संघात त्यांचा समावेश झाला आहे. अब्दुल कोचरगी, वैभव कोंडेकर, यशवंत संकपाळ अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.
मध्य प्रदेश येथे १ जुलैपासून यूथ लीग व एमपी फुटबॉल लीग सुरू होणार आहे. त्यासाठी मुंबई येथे अंतिम निवड चाचणी घेतली होती. या चाचणीतून अब्दुल, वैभव व यशवंत यांची कासा बडवाणी एफसीमध्ये निवड झाली. अब्दुल व यशवंत येथील शिवराज महाविद्यालयात शिकत आहेत, तर वैभव वि. दि. शिंदे हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्यांना प्रशिक्षक किरण कावणेकर, आकाश चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. ‘शिवराज’चे सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, इम्रान बाणदार, मौसिन नदाफ, निखिल खन्ना यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72183 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top